राहुल गांधी अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, मुंगेरीलाल के हसीन सपने…; फडणवीसांचा खोचक टोला

राहुल गांधी अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, मुंगेरीलाल के हसीन सपने…; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : येत्या 1 जून रोजी लोकसभेच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक विजयाचा दावा करत आहेत. भाजप (BJP) आणि एनडीएने 400 पार करण्याचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे इंडिया अलायन्सनेही (India Alliance) आम्ही सत्तेत येणार असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 4 तारखेला भाजप सरकार घरी जाणार असं विधान केलं. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर भाष्य केले आहे.

Lok Sabha : ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? निकालाकडे साऱ्यांचे लक्ष 

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोतलांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणतात, 4 जूनला मोदी सरकार घरी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी लहान होतो तेव्हा मुंगेरीलाल के हसीन सपने ही मालिका टीव्हीवर दाखवली जात होती. त्यात दाखवल्याप्रमाणे मुंगेरीलाल स्वप्न बघायचा, तशीच स्वप्न राहुल गांधींनाही पाहू द्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, अशी स्वप्न त्यांना पडत असतील. त्यांना खुशाला स्वप्नं पाहू द्या, लोकांनी मोदींना निवडलं आहे, हे आम्ही पाहतो आहोत, असं म्हणत फडणवीसांनी राहूल गांधींना टोला लगावला.

राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या तारखेत मोठा बदल, 6 जुलैऐवजी ‘या’ तारखेला होणार परीक्षा 

काय म्हणाले राहुल गांधी?
खोट्या दाव्यांचा कारखाना असलेल्या भाजपाने स्वत:ला कितीही दिलासा दिला तरीही काही फरक पडणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात आता इंडिया आघाडीने वादळ वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे पंतप्रधान राहणार नाहीत. असं राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.

४८ तासांत पंतप्रधानांची निवड केली करणार
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळेल आणि निकाल लागल्यानंतर 48 तासांत पंतप्रधानांची निवड केली जाईल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. विरोधी आघाडीत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पुढच्या नेतृत्वाचा स्वाभाविक दावेदार असेल. जनतेचा जनादेश मिळाल्यानंतर इंडिया आघाडीचे सरकार हुकूमशाही नव्हे तर सरकारवादी असेल. सरकारला बहुमत मिळाल्यानंतर एनडीएचे काही मित्रपक्षही त्यात सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांचा इंडिया आघाडीत समावेश करायचा की नाही, याचा निर्णय काँग्रेस हायकमांडला घेईल, असं रमेश यांनी सांगितलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज