नरेंद्र मोदी हॅट्रीक करणार का? राहुल गांधींंना किती यश? ज्योतिषी मारटकर यांचं मोठ भाकीत

नरेंद्र मोदी हॅट्रीक करणार का? राहुल गांधींंना किती यश? ज्योतिषी मारटकर यांचं मोठ भाकीत

Lok Sabha Elections 2024 :  सध्या राजकीय पक्षांकडून लोकसभेला (Lok Sabha ) आपण किती जागा जिंकणार, कशा जिंकणार याबाबत दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांचा 1 जून रोजी शेवटचा टप्पा पार पडतोय. (Lok Sabha Elections) त्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती 4 जूनची. मात्र, 4 जूनच्या अगोदरच अनेक दावे-प्रतिदावे होत असताना काही ज्योतिषांनीही आपली भाकीत व्यक्त केली आहेत. (Elections ) नुकतेच लेट्सअप मराठीशी बोलताना सिद्धेश्वर मारटकर यांनी अनेक राजकीय नेत्यांबद्दल आपल भाकीत वर्तवलं आहे.

लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? प्रशांत किशोरनंतर योगेंद्र यादवांचं मोठं भाकित

यामध्ये बोलताना मारटकर म्हणतात, पंतप्रधानांनी अनेक धाडशी निर्णय घेतलेले आहेत. तसंच, ते सुमारे 320 ते 350 लोकसभेच्या जागा जिंकून पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. त्याचबरोबर 2024 चं नाही तर 2029 लाही मोदीच पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील लोक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत असंही ते म्हणाले.

 

राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांची पत्रिका तशी लाभदायक नाही. त्यांच्या बोलण्याचा जास्त प्रभाव पडत नाही. तसंच, त्यांच बोलन हे लोकांना तितकं आवडत नाही. त्याचबरोबर पंतप्रधान पदासाठी त्यांना आणखी तरी तसा कौल मिळत नाही. त्याचबरोबर भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या अनुकुलतेत फरक पडला. परंतु, तो गेल्या लोकसभेला 40 जागा मिळाल्या होत्या, त्या यावेळी 60 पर्यंत जाऊ शकतो इतकाच फरक झाला आहे असंही ते म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकांसह पवार अन् ठाकरेंविषयी ज्योतिषी अनिल थत्ते यांचं मोठं भाकीत

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत स्वत: माघार घेत नाहीत किंवा बाजूला होत नाहीत तोपर्यंत पंतप्रधान पदासाठी कुणालाही संधी मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत. तसंच, सध्या जे चित्र दिसत ते म्हणजे या लोकसभेनंतर अमित शाह उपपंतप्रधान होऊ शकतात. आणि नरेंद्र मोदी यांनी माघार घेतली तर अमित शाह किंवा नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात. कारण त्यांचे ग्रहमान चांगले आहेत असंही ते म्हणाले आहेत. तरीही यामध्ये प्रामुख्याने शाह यांना संधी दिली जाऊ शकते असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज