Lok Sabha 2024 : PM मोदी, अखिलेश अन् राहुल.. पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?

Lok Sabha 2024 : PM मोदी, अखिलेश अन् राहुल.. पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?

Lok Sabha Elections : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यंदाची निवडणूक अनेक अर्थानी खास आहे. पीएम मोदी पुन्हा मैदानात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, स्मृती इराणी यांसारखे दिग्गज नेतेही मैदानात आहेत. या उमेदवारी अर्जांबरोबर त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीची सुद्धा माहिती दिली आहे. राजकारणी मंडळींकडे किती पैसा आहे याचं कुतूहल सामान्य माणसाला नेहमीच असतं. आपला नेता किती श्रीमंत आहे, त्याचं राहणीमान कसं आहे या गोष्टींची चर्चा नेहमीच होत असते. चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांकडे किती संपत्ती आहे आणि मागील काळात या संपत्तीत किती वाढ झाली.

पीएम मोदींकडे किती संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत त्यांच्या हातात 24 हजार 920 रुपये रोख होते. तसेच निवडणूक बँक खात्यातून त्यांनी 13 मे रोजी 28 हजार रुपये काढले. अशा पद्धतीने त्यांच्या हातात एकूण 52 हजार 920 रुपये होते. त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 86 लाख 40 हजार 642 रुपये जमा आहेत. यात स्टेट बँकेतील एफडीमध्ये 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपये जमा आहेत. गांधीनगर येथील स्टेट बँकेच्या खात्यात 73 हजार 304 रुपये जमा आहेत.

मोदी यांच्याकडे 9 लाख 12 हजार 398 रुपयांचे नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट सुद्धा आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांना टीडीएस रिटर्नच्या आधारावर 3 लाख 31 हजार 179 रुपये मिळाले. अशा प्रकारे मोदींची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे. 2019 मधील प्रतिज्ञापत्रात मोदींची संपत्ती 2 कोटी 51 लाख 36 हजार 119 रुपये होती. मागील पाच वर्षात मोदींच्या संपत्तीत एकूण 50 लाख 70 हजार 770 रुपयांची वाढ झाली आहे.

“चहावाला टू चीन..” मणिशंकर अय्यरांचे सेल्फ गोल अन् काँग्रेस क्लीन बोल्ड

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधीनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2018-19 या वर्षात राहुल गांधींनी 1 कोटी 20 लाख 37 हजार 700 रुपयांची कमाई केली. 2019-20 मध्ये 1 कोटी 21 लाख 54 हजार 470 रुपये, 2020-21 मध्ये 1 कोटी 29 लाख 31 हजार 110 रुपये, 2021-22 मध्ये 1 कोटी 31 लाख 4 हजार 970 रुपये आणि 2022-23 या वर्षात 1 कोटी 2 लाख 78 हजार 680 रुपये होती.

राहुल गांधी यांच्या जवळ वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 55 हजार रुपये रोख पैसे आहेत. एसबीआय पार्लीयामेंट हाऊस खात्यात 2,21,383 रुपये, एचडीएफसी बँकेच्या खात्यात 26,25,271 रुपये आहेत. 15 मार्च 2024 रोजी राहुल गांधींकडे एकूण चल संपत्ती 9,24,59,264 रुपये होती. यामध्ये विविध कंपन्यांचे 4,33,60,519 रुपयांचे शेअर्स आहेत. तसेच त्यांच्याकडे 11,15,2,598 रुपयांची अचल संपत्ती आहे.

15 वर्षांत पाच पट वाढली अखिलेश यादव यांची संपत्ती

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यंदा कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार यादव यांच्याकडे एकूण 26,34,92,586 रुपये इतकी संपत्ती आहे. 2009 मधील निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती 5,52,83,157 रुपयांची संपत्ती होती. पंधरा वर्षात त्यांच्या संपत्तीत पाच पट वाढ झाली आहे. आजमितीस अखिलेश यांच्याकडे 25,64,804 रुपये कॅश आहे. त्यांच्याकडे एकूण 9,12,91,728 रुपयांची चल संपत्ती आहे. तसेच त्यांच्या नावावर 17 कोटी 22 हजार 858 रुपयांची अचल संपत्ती आहे.

स्मृती इराणीच्या संपत्तीत सहा कोटींची वाढ

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत 6 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती 11 कोटी रुपयांची होती. आता 2024 मधील निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार इराणींची संपत्ती 17 कोटींच्या पुढे गेली आहे.

2014 मध्ये 41, यंदा फक्त 6 ‘भिडू’ देताहेत PM मोदींना टक्कर; उमेदवारांची प्रोफाइलही खास..

स्मृती इराणी यांच्याकडे 1 लाख 8 हजर 740 रूपये, त्यांचे पती जुबिन इराणी याच्याकडे 3,21,700 रुपये कॅश आहेत. त्यांच्याकडे एकूण 3 कोटी 8 लाख 94 हजार 296 रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांचे पती जूबिन यांच्याकडे 3 कोटी 30 लाख 17 हजार 790 रुपये किमतीची चल संपत्ती आहे. तसेच स्मृती इराणी यांच्याकडे 5 कोटी 66 लाख 30 हजार रुपयांची तर जुबीन यांच्याकडे 5 कोटी 51 लाख 60 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

डिंपल यादव यांच्या संपत्तीत अडीच कोटींची वाढ

अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव मैनपुरी मयदासंघातून निवडणूक लढत आहेत. मागील पाच वर्षांत त्याच्या संपत्तीत 2 कोटी 58 लाख रुपयांची वाढ झाली आहे. मागील वेळी त्यांनी कन्नोज मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यावेळी भाजपचे सुब्रत पाठक यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 12 कोटी 98 लाख रुपये नमूद करण्यात आली होती. आता 2024 मधील प्रतिज्ञापत्रात 15 कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

त्यांच्याकडे 10 कोटी 44 लाख 55 हजार 918 रुपयांची अचल संपत्ती आहे. तर 5 कोटी 10 लाख 35 हजार 379 रुपयांची चल संपत्ती आहे. डिंपल यांच्याकडे सोने आणि हिऱ्यांचे 56.79 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्या हातात 5 लाख 72 हजार 447 रुपयांची कॅश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज