Lok Sabha elections 2024 : अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार

Lok Sabha elections 2024 : अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार

Akhilesh Yadav will contest Lok Sabha elections : अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा (Kannauj Lok Sabha) मतदारसंघातून अखिलेश निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाने दिली आहे. अखिलेश यादव हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश आंबेडकर एमआयएमला पाठिंबा देणार? 

गेल्या काही दिवसांपासून अखिलेश यादव लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी लालूंचे जावई तेजप्रताप यादव यांना कन्नौजमधून उमेदवारी दिली होती. अखिलेश यांच्या या निर्णयामुळं सपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तयार झाली होती. त्यांनी तेजप्रताप यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळं अखिलेश यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे निर्णय घेण्यासाठी २४ तासाचा अवधी मागितला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण सपा नेत्यांची फौज उपस्थित राहणार आहे. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, काका डॉ.रामगोपाल यादव आणि शिवपाल यादवही उपस्थित राहणार आहेत. नामांकनाच्या वेळी स्वतः तेज प्रताप यादवही येथे उपस्थित राहणार आहेत.

कनौज लोकसभा सपाचा बालेकिल्ला
कनौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. 1998 ते 2014 पर्यंत समाजवादी पक्ष या जागेवर सातत्याने विजय मिळवत आला आहे, परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या सुब्रत पाठक यांनी कनौजमधून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा पराभव करून कनौजची जागा काबीज केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची युती होती. या निवडणुकीत डिंपल यादव यांना 5 लाख 50 हजार 734 मते मिळाली, तर सुब्रत पाठक यांना 5 लाख 63 हजार 87 मते मिळाली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज