7 कोटी 79 लाख जमा… ज्यूस विक्रेत्याला आयकर विभागाची नोटीस, मग घडलं भयंकर

7 कोटी 79 लाख जमा… ज्यूस विक्रेत्याला आयकर विभागाची नोटीस, मग घडलं भयंकर

Income Tax Notice To Juice Seller : आयकर विभागाने (Income Tax Notice) एका लहान ज्यूस विक्रेत्याला 7 कोटी 79 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. त्यामुळं ज्यूस विक्रेता (Juice Seller) मोहम्मद रईस आणि त्याचं कुटुंब धक्क्यामध्ये आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील अलीगडमध्ये घडली आहे. सराई रहमान परिसरात राहणारा मोहम्मद रईस आपल्या आईवडिलांचा, पत्नीचा आणि मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक छोटेसं (Uttar Pradesh) ज्यूसचं दुकान चालवतो. पण अलीकडेच त्याला पोस्टाद्वारे एक नोटीस मिळाली, जी उघडल्यानंतर त्याला धक्काच बसला.

मोहम्मद रईसची पत्नी हिना म्हणते की, या नोटीशीनंतर संपूर्ण कुटुंब अत्यंत चिंतेत आहे. आम्ही गरीब लोक आहोत आणि माझे पती एक छोटे ज्यूसचे दुकान चालवतात. एवढी मोठी नोटीस का देण्यात आलीय, हे आम्हाला समजत नाही. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसमुळे सदर कुटुंब चिंतेत आहे. घरी सगळे काळजीत आहेत आणि माझ्या सासूची तब्येतही बिघडली आहे. आम्हाला यावर लवकरात लवकर तोडगा हवाय. या नोटीसमध्ये, आयकर विभागाने 7.79 कोटी रुपयांची मोठी रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

माझा विवाह झाला नाही ही देवाचीच कृपा; मेरठच्या सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य

रईस आणि त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, ही नोटीस काही चुकीमुळे आली असावी. त्यांनी प्रशासनाला या प्रकरणाची योग्य चौकशी करून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान एका कारमधून 1.25 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तेथील पोलिसांनी पंजाब आयकर विभागाच्या शाखेला याची माहिती दिली. जेव्हा विभागाने चौकशी केली, तेव्हा त्यांना आढळून आलं की ही रोकड एका कंपनीची होती, जी चौकशीनंतर बोगस असल्याचं आढळून आलंय.

थेट राज्य सचिवांना पत्र अन् पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वारगेट प्रकरणातील पिडीतेची मोठी मागणी

रईसचे पॅन कार्ड या बोगस कंपनीत नोंदणीकृत आढळले. जेव्हा आयकर विभागाने कंपनीच्या इतर व्यवहारांच्या तपशीलांची तपासणी केली तेव्हा रक्कम वाढतच गेली. पंजाब आयकर विभागाने त्यांच्या विभागीय पोर्टलवर हे प्रकरण मांडलं आहे. अलिगड आयकर विभागाच्या संबंधित शाखेने या माहितीची दखल घेतली. पॅन कार्डमध्ये नमूद केलेल्या पत्त्याच्या आधारे रईसला नोटीस बजावण्यात आली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube