मोठी बातमी! उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, चार जण ठार…
Dibrugarh Express : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला आहे. चंदीगडहून दिब्रुगडला (Dibrugarh Express ) जाणाऱ्या दिब्रुगढ एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. ही अपघाताची घटना गोंडा-मनकापूर स्टेशनजवळ घडली आहे. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
VIDEO | A few bogies of Dibrugarh Express derailed near UP’s Gonda railway station earlier today. Details awaited. pic.twitter.com/SfJTfc01Wp
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2024
वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती, बादल्या लावण्याची वेळ, पाहा Video
दिब्रुगड एक्स्प्रेस (15904) ही ट्रेन गुरुवारी रात्री 11.39 वाजता चंदीगडहून सुटली. गुरुवारी दुपारी ही ट्रेन गोंडा-मानकापूर स्ठानकावर आली असता एक्स्प्रेसचे काही डबे अचानक रुळावरून घसरले. आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनचे 10-12 डबे रुळावरून घसरले आहेत. गाडी रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. लोक घाबरून ओरडू लागले होते. ट्रेन थांबताच प्रवासी बाहेर आले.
मोठी बातमी! उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. या अपघातात आतापर्यंत चार प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रेल्वे अपघाताची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.