मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना! 12 जण रेल्वे ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू

Mumbai Local Train Accident 5 died : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) घडली.
पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण
आठ ते बारा प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याचा (Mumbai Accident) अंदाज वर्तविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार पाच प्रवाशी मृत झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचे कारण ट्रेनमधील क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याचे मानले जात आहे. ट्रेन इतकी भरलेली होती की, प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत होते, त्यादरम्यान हा अपघात झाला.
Maharashtra | Some passengers travelling towards CSMT fell from the train at Thane’s Mumbra railway station. The reason for the accident is believed to be excessive crowd in the train. The railway administration and police have reached the spot. The injured are being taken… pic.twitter.com/UMBq41jcvm
— ANI (@ANI) June 9, 2025
ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अपघात झाला का?
सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिक सेवांवरही परिणाम झाला (Railway Accident) आहे. 5 हून अधिक लोक ट्रेनमधून पडले, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आणि उर्वरितांना उपचारासाठी नेण्यात आले. मुंब्रा स्थानकावर आधीच प्रवाशांची मोठी गर्दी आहे. प्रवासी ट्रेनमध्ये चढताच ते रुळावर पडले.
मोठी बातमी! पंढरपुरात वशिवल्याचे दर्शन बंद, श्री विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय
मध्य रेल्वेने काय म्हटले?
या अपघाताची माहिती देताना मध्य रेल्वेने सांगितले की, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे.