पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण

पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण

Pune Crime News Koyta Gang Attack On Youth In Shivajinagar : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. एका टोळक्याने दोन तरूणांवर सपासप वार केल्याची घटना (Pune Crime) घडली. त्यामुळे मध्यरात्रीच शिवाजीनगरमध्ये मोठी खळबळढ उडाली होती. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरूणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये (Koyta Gang Attack) आयान आणि फिरोज नावाचे तरूण गंभीर झाले आहेत.

परिसरामध्ये वाहनांच्या काचा फोडल्या. तरूणांना मारहाण करत या टोळक्याने ( Koyta Gang) दहशत माजवली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समीर शेख (वय 48, रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य बडसकर, रोहन शिंदे , अथर्व कदमआणि प्रथम मोहितेया चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पैशांचा पाऊस पडणार! ‘या’ तीन राशीच्या लोकांना आज व्यवसायात होणार नफा, तुमचं काय?

आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन (Crime News) केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं? असा सवाल उपस्थित होतोय.

महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर सहा जण बुडाले; लग्नघरावर काळाचा घाला…

तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार समीर शेख यांचा मुलगा आणि पुतण्या यांचा आरोपींसोबत अगोदर वाद होता, असं सांगितलं जातंय. हाच वाद या हल्ल्याला कारणीभूत असल्याची देखील माहिती मिळतेय. तर शनिवारी मध्यरात्री चार ते पाच जणांचे टोळखे तोफखाना परिसरात दाखल झाले होते. त्यांच्याकडे कोयते आणि इतर हत्यारे होते. त्यांनी कोयत्याने वार करत आयान आणि फिरोजला जखमी केलं. त्यानंतर या टोळक्याने वाहनांच्या काचा फोडत परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube