Arnav Cyclone : ‘अर्णव’ येतोय.., पाच राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा ; NDRF तैनात

Arnav Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासारखी पुन्हा एकदा स्थिती निर्माण होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Arnav Cyclone

Arnav Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासारखी पुन्हा एकदा स्थिती निर्माण होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अर्णव चक्रीवादळामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगाली भाषेत ‘अर्णव’चा अर्थ ‘महासागर’ असा होतो.

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 26 ऑक्टोबरपर्यंत या प्रणालीचे रूपांतर चक्रीवादळात होईल. त्यानंतर ते वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमीपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे कच्ची घरे, झाडे आणि कमकुवत वीज खांबांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम केवळ आंध्र प्रदेशपुरता मर्यादित राहणार नाही तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चेन्नई, नागपट्टिनम, कुड्डालोर, कराईकल, पंबन आणि थुथुकुडीसह नऊ बंदरांवर चक्रीवादळाचा इशारा देणारे संकेत (सिग्नल्स) लावण्यात आले आहेत.

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुद्दुचेरी, कराईकल आणि तामिळनाडूच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जरी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकण्याचा अंदाज असला, तरी किनारपट्टीवरील राज्य असलेल्या ओडिशामध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, दक्षिण आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना पूर्णपणे सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओडिशामधील 5 जिल्ह्यांत  28-29 ऑक्टोबर रोजी शाळा बंद राहणार

ओडिशामधील गंजाम, गजपती, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी या पाच जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये यांचा समावेश होतो. याशिवाय, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अधिकाऱ्यांना सर्वसमावेशक तयारी करण्याचे निर्देश दिले असून, “कोणतीही जीवितहानी होऊ नये” (झिरो कॅज्युअल्टी) हे उद्दिष्ट ठेवले आहे.

राहुल गांधींना मोठा दिलासा; 2018 च्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता-

आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ओडिशामध्ये ‘ओडिशा डिझास्टर रॅपिड ॲक्शन फोर्स’ची (ODRAF) सुमारे 60 पथके, ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ची (NDRF) 17 पथके आणि अग्निशमन दलाची 225 पथके तैनात करण्यात आली आहेत.

follow us