मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं जोरदार आगमन; मराठवाड्यासह विदर्भात हवामान विभागाचा अंदाज काय?

Rain Update : आज 12 सप्टेंबरला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 12T175027.303

Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागांत सध्या हलक्या (Rain) ते मध्यम सरी सुरू असल्या तरी अनेक भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आज 12 सप्टेंबरला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि पालघरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नंदुरबार, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला आणि अमरावती येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

पावसाच्या विलंबामुळं शेतकरी संकटात; मराठवाड्यात कुठं किती पाऊस अन् आजच चित्र काय?

उद्या 13 सप्टेंबरला पावसाचा जोर काही भागांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिक घाटमाथ्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे विजांसह पावसाचा अंदाज आहे.

सोमवारी 14 सप्टेंबरला नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, अहिल्यानगर आणि पुणे घाटमाथ्यासह पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. नांदेड, परभणी, बीड, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून 15 सप्टेंबरला राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

follow us