चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील एका मुलीचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांचा तामिळ सरकारला संपर्क
तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते.
चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी (Chennai) गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून, या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.
तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला, तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही आणि त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.
अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त; CM फडणवीसांची मोठी घोषणा
जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
तसंच, तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.