धक्कादायक बाब उघड! दुधात भेसळसाठी वापरली ‘व्हे पर्मिएट पावडर’, मराठवाड्यात FDA’ची मोठी कारवाई
दूध संकलन केंद्राच्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
दुधात भेसळ करण्यासाठी वापरली (FDA) जाणारी ‘व्हे पर्मिएट पावडर’च एफडीएच्या हाती लागली आहे. राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. फुलंब्रीतील दोन दूध डेअरी सील करण्यात आल्या असून, भेसळयुक्त दूध आणि दूध पावडर नष्ट करण्यात आली आहे.
दुसरीडे आज शिर्डीजवळील एका गावात एफडीएने कारवाई करत दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे, राज्यभर तुकाराम मुंढे इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारीवाडी येथे दूध संकलन केंद्रावर छापा टाकून दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी व्हे पर्मिएट पावडर आणि साडेसात हजार लिटर दूध जप्त करण्यात आलं. पाच लाखांहून अधिक किमतीचा हा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील सिद्धेश्वर आणि शिवकृपा दूध डेअरीवरही कारवाई करण्यात आली.
संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करून नष्ट करण्यात आली असून दोन्ही डेअरी सील करण्यात आल्या आहेत. संबंधितांविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलंब्री येथील या डेअरींमधून इतर राज्यांमध्येही दूध पुरवठा होत असल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली असून, तपासाचा विस्तार करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेडमधील एका मसाला उद्योगावर कारवाई करत लेबलिंग नियमांचे उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या संशयावरून एक हजार ६१ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आलं आहे.
दूध भेसळीचा मुद्दा जयंत पाटलांनी सभागृहात मांडला, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे दिला आहे. संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकले यांनी दिला आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर गावात FDA ने कारवाई करत दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.
येथील साई जतिन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी केली. येथील दूध संकलन केंद्राच्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. दूध टँकर नोंदी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दूध संकलन, डिस्पॅच, लॅब आणि टँकर रिजेक्शनच्या नोंदी अपूर्ण असल्याचं FDA पथकाच्या तपासणीत समोर आल. गेल्या सहा महिन्यात दूध संकलन केंद्राचे 22 टँकर रिजेक्ट झाले. मात्र, दूध संकलन केंद्राकडे कुठलीही नोंद नसल्याची गंभीर बाब समोर आली असून FDA ने दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.