‘धमाल 4’च्या टीमला आशिष चौधरीचा भन्नाट संदेश; “मला माझा ‘W’ मिळालाय ब्रॉ!”
चित्रपटातील ‘बोमन’ या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आशिष चौधरीने संपूर्ण ‘धमाल 4’ टीमला एक मजेशीर शुभेच्छा संदेश दिला आहे.
Ashish Chaudhary’s fantastic message : ‘धमाल 4’चा खजिना शोधण्याचा धमाल प्रवास सध्या प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. विनोद, गोंधळ, साहस आणि भन्नाट प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच चित्रपटातील ‘बोमन’ या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आशिष चौधरीने संपूर्ण ‘धमाल 4’ टीमला एक मजेशीर शुभेच्छा संदेश दिला आहे.
आशिषने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मूळ ‘धमाल’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘W’ चा हलकासा संदर्भ दिसून येतो. या पोस्टसोबत त्याने विनोदी अंदाजात लिहिले, “#Dhamaal4 टीमला त्यांचा खजिना सापडण्यासाठी शुभेच्छा… मला तर माझं ‘W’ मिळालंय ब्रॉ!” या संदेशासोबत त्याने हसणारे इमोजीही वापरले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आशिष चौधरीच्या या पोस्टने ‘धमाल’ मालिकेच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. मूळ चित्रपटातील अनेक प्रसंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि त्यातील ‘W’ हा संदर्भ चाहत्यांसाठी विशेष ठरला आहे. त्यामुळे आशिषची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दिशाभूल करू नका; महाराष्ट्रातील गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून सभागृहात आकडेवारी मांडत विरोधकांना उत्तर
‘धमाल 4’मध्ये यावेळीही विनोदाचा जबरदस्त तडका पाहायला मिळत आहे. अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांची लोकप्रिय टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.
गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, देवगण फिल्म्सच्या सहकार्याने तयार झालेला हा चित्रपट टी-सीरिज फिल्म्स, मारुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज यांच्या निर्मितीत साकारला आहे. इंद्र कुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
विनोद, मनोरंजन आणि कौटुंबिक करमणुकीचा खजिना घेऊन आलेला ‘धमाल 4’ सध्या देशभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.