राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रीय होणार? कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला यलो अलर्ट

Maharashtra Monsoon Will Active From 13 June : राज्यात मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने जुन महिन्यात मात्र ब्रेक (Rain Update) घेतल्याचं दिसतंय. तर राज्यातील शेतकरी आता मान्सून सक्रीय कधी होणार? याची वाट पाहात आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून दाखल झालेला नाही. याच अनुषंगाने हवामान विभागाने (Monsoon) महत्वाची माहिती दिली आहे.
घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहेत. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 अन् 10 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. कोकण-गोव्यात (Maharashtra Rain) काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेवादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं कळतंय. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट आयएमडीकडून देण्यात आलाय.
GMC Doctor Suspension : मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्याला तोंडावर पाडलं…
आज कुठे कोसळणार पावसाच्या सरी?
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विजासंह पावसाचा अंदाज कायम आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भामध्ये मुख्यतः कोरड्या हवामानासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यावर अडकलेल्या दिसल्या. रस्त्यावरील तलावात एक बसही बुडालेली दिसली. या बसच्या समोरील आरशापर्यंतही पाणी दिसत होते. कसेबसे चालकाने बस पाण्यातून बाहेर काढली.
महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर सहा जण बुडाले; लग्नघरावर काळाचा घाला…
शनिवारी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हिंजवडी आयटी पार्क रोडवर पुणे महानगरपालिकेची एक एसी बस पूर्णपणे पाण्यात बुडालेली दिसत आहे, परंतु तरीही ती हळूहळू पुढे जात आहे. पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात 150 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.