महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर सहा जण बुडाले; लग्नघरावर काळाचा घाला…

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात तेलंगणाच्या हद्दीत सहा मुले नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.

Maharashtra Telgana

Godavari River : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात तेलंगणाच्या हद्दीत सहा मुले नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. लग्नासाठी आलेल्या या सहा जणांवर काळाने घाला घातलायं. या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडालीयं.

गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला मेडीगड्डा कालेश्वरम हे मोठं धरण आहे. धरणाला लागून असलेला गोदावरी नदीचा पात्र महाराष्ट्राची सीमा पार करताच तेलंगणाच्या हद्दीत आहे. मेडिगड्डा लक्ष्मी बॅरेजच्या वरच्या प्रवाहात गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेली सहा मुलं बुडाली आहे.

“आपण महायुतीत आहोत, नितेशनं जपून बोलावं”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भावाचा नितेश राणेंना सल्ला

अद्यापही या सहा मुलांची मृतदेह आढळून आलेली नाहीत. तेलंगणाच्या अंबडपल्ली येथील एका लग्नासाठी आलेली ही 11 ते 18 वयोगटातील मुले संध्याकाळी बुडाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा गोदावरी नदीच्या काठावर अजूनही आक्रोश सुरुच आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेलंगणा पोलिस गोदावरीच्या तीरावर दाखल झाले असून मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहिम सुरु केली आहे. मात्र, रात्र झाल्याने ही शोधमोहिम राबवणे कठीण झालं असून उद्यापर्यंत या मुलांचं नेमकं काय झालं असावं ते स्पष्ट होणार आहे.

तारीख ठरली! ‘या’ दिवशी उलगडणार समसाराचे गूढ, हॉरर टीजरमुळे उत्सुकता वाढली

बुडालेल्या मुलांची नावं…
पत्ती मधुसूदन (१५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११, चौघे रा. आंबटपल्ली, तेलंगणा), पांडू (१८) व राहुल (१९, दोघे रा. कोरलाकुंडा, तेलंगणा) यांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube