अभियंता, युद्धकलेत तज्ज्ञ अन् 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस; कोण होता नक्षलवादी बसवराजू ?

अभियंता, युद्धकलेत तज्ज्ञ अन् 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस; कोण होता नक्षलवादी बसवराजू ?

Who Was Naxalite Basavaraju : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये (Narayanpur) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत 26 पेक्षा जास्त नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या चकमकीच एक जवान देखील शहीद झाला आहे. सुरक्षा दलांनी या चकमकीत नक्षलवादी नवबल्ला केशव राव (Navballa Keshav Rao) उर्फ ​​बसवराजू (Basavaraju) याला ठार मारले आहे. बसवराजू नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस होता. त्याला डीआरजी (DRG) सैनिकांनी ठार मारले आहे. तो 70 वर्षांचा होता.

माहितीनुसार, गेल्या 35 वर्षांपासून तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि सरकारने त्याच्यावर तब्बल 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बसवराजू श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियानापेटा गावचा होता. तो नोव्हेंबर 2018 पासून सीपीआय माओवादी संघटनेचा सरचिटणीस होता आणि त्याच्याकडे छत्तीसगड (Chhattisgarh), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) , तेलंगणा (Telangana) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या भागाची जबाबदारी होती. तो 24 वर्षापासून पॉलिटब्युरो सदस्य म्हणून काम करत होता.

तसेच त्याने पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. माहितीनुसार, बसवराजूने वारंगल येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते आणि वारंगल येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक करुन 1970 मध्ये घर सोडले होते. तसेच बसवराजू युद्धकलेत तज्ज्ञ होता अशी देखील माहिती समोर आली आहे. बसवराजू सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी आणि आक्रमक हल्ले करण्यासाठी ओळखला जात होता. हल्ल्यांचे नियोजन करण्यात देखील तो तज्ज्ञ होता. त्याला नवबल्ला केशव राव गंगण्णा, विजय, दर्पू नरसिंह रेड्डी, नरसिंह, प्रकाश, कृष्णा या नावाने देखील ओळखले जात होते. 2010 मध्येदंतेवाडा येथे सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्याचा तोच सुत्रधार होता. या हल्ल्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

बसवराजूने कोणते हल्ले आखले होते?

2010 चा दंतेवाडा हल्ला- या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले.

2013 चा जिराम घाटी हल्ला: या नक्षलवादी हल्ल्यात 27 जण ठार झाले होते, ज्यात छत्तीसगडचे माजी मंत्री महेंद्र कर्मा आणि काँग्रेस नेते नंद कुमार पटेल यांचा समावेश होता.

2018 अराकू हल्ला: आंध्र प्रदेश तेलुगू देसम पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांच्या हत्येची योजनाही बसवराजू यांनीच आखली होती.

PMO कार्यालयात उपसचिव ते बीडचे जिल्ह्याधिकारी, जाणून घ्या पुण्याचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांच्याबद्दल सर्वकाही

2019 चा गडचिरोली हल्ला: महाराष्ट्रातील 15 कमांडो आणि आणखी एका व्यक्तीच्या हत्येत बवराजूचाही सहभाग होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube