छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, २६ हून अधिक नक्षलवादी ठार, १ कोटींचे बक्षीस असलेला लीडरही संपला

Over 26 Naxals killed in Chhattisgarh encounter, top leaders likely dead : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात डीआरजी सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 26 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी बुधवारी नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली. त्यांनी असेही म्हटले आहे की या चकमकीत काही मोठे नक्षलवादी मारले गेले आहेत. तर, या कारवाईदरम्यान एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर एका जवान या कारवाईवेळी शहीद झाल्याचे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले.
More than 26 Naxalites killed in encounter with security forces along
Narayanpur-Bijapur border in Chhattisgarh: officials— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यातील जंगली अबुझमद भागात नक्षलविरोधी एक मोठी मोहीम सुरू होती, जिथे नक्षलवादी आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांमध्ये चकमक झाली. यात 26 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आ ठिकाणी जवानांकडून सर्च ऑपरेशन राबविले जात आहे.
#WATCH | Kawardha | Chhattisgarh Deputy CM Vijay Sharma says, "…More than 26 naxalites have been killed by the security forces…One Jawan has been injured but is out of danger. One of our associates lost his life during the operation…" https://t.co/PjbXzdPzUo pic.twitter.com/vgcqjwIgA5
— ANI (@ANI) May 21, 2025
नक्षलवाद्यांचा मोस्ट वाँटेड लीडर ठार
अबुझहमद चकमकीत आतापर्यंत 26 हून अधिक नक्षलवादी मारले गेले असून, यात नक्षलवादी लीडर नंबाला केशव राव उर्फ बसव राज याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. बसव राजवर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते आणि तो नक्षलवाद्यांचा सरचिटणीस होता. बसवराजचा देशभरातील सुरक्षा एजन्सी कसून शोध घेत होत्या, ज्याला आता डीआरजी दलांनी ठार मारले आहे.
केंद्राची देशाला नक्षलमुक्त करण्याची मोहीम
केंद्र सरकारने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. त्या अंतर्गत नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. अलीकडेच, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात नक्षलवाद्यांवर २१ दिवस कारवाई करण्यात आली. ज्यात वेगवेगळ्या चकमकीत ३१ नक्षलवादी मारले गेले. तसेच, नक्षलवाद्यांचे १५० हून अधिक बंकरदेखील उद्ध्वस्त करण्यात आले.