मोठी बातमी ! झारखंडमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खातमा ; एक कोटींचे बक्षीस असणाऱ्याला संपविले

Eight Naxals killed Jharkhand encounter: झारखंडमधील ( Jharkhand) बोकारो जिल्ह्यात सोमवारी सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली. या चकमकीत आठ नक्षलवादी ( Naxalist) ठार झाले आहे. त्यात एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. बाकोरी जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगु हिल्स येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही चकमक झाली.
209 कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) च्या जवानांनी राज्य पोलिसांसह ही कारवाई केलीय. एक एके सीरिज रायफल, तीन इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर), आठ देशी बनावटीच्या बंदुका आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
#WATCH | Ranchi: On Naxals killed in the state, Jharkhand DGP Anurag Gupta says, "I would say that the Naxalites who are active should surrender and come to the mainstream as soon as possible." pic.twitter.com/dMGtAKWxkx
— ANI (@ANI) April 21, 2025
या आठ जणांना संपविले
ठार झालेल्यांमध्ये अतिरेकी संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य प्रयाग मांझी उर्फ विवेक, विशेष क्षेत्र समिती सदस्य अरविंद यादव उर्फ अविनाश, झोनल कमिटी सदस्य साहेबराम मांझी उर्फ राहुल मांझी, महेश मांझी उर्फ मोटा, तालू, रंजू मांझी, गंगाराम आणि महेश यांचा समावेश आहे. विवेक यांच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते, अरविंद यादव यांच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते आणि साहेबराम मांझी यांच्यावर दहा लाख रुपयांचे बक्षीस होते. हिंसाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय समिती ही माओवादी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, असे त्यांनी सांगितले.
नक्षलवादी पथके पूर्णपणे नष्ट : अनुराग गुप्ता
या कारवाईबाबत झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता म्हणाले, “या चकमकीमुळे उत्तर छोटा नागपूर भागातील नक्षलवादी पथके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.राज्यभरातून माओवाद्यांचा जवळजवळ नायनाट झालाय. ते फक्त चाईबासा प्रदेशातच आहेत. आम्ही आमच्या सर्व सैन्यासह सारंडा परिसरात सीआरपीएफ, झारखंड जग्वार आणि झारखंड सशस्त्र पोलिस दलांना स्थलांतरित करणार आहोत. आमचे लक्ष्य पुढील 15 ते 20 दिवसांत किंवा निश्चितच पावसाळ्यापूर्वी या भागातील सर्व नक्षलवादी पथकांचा खात्मा करणे आहे. आम्ही चाईबासाच्या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करतो. आमचे आत्मसमर्पण धोरण चांगले आहे, असे गुप्ता म्हणाले. या वर्षी छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये 140 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत.