Breaking..! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा

Breaking..! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh News : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा (Chhattisgarh News) आणि बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल (Indian Army) आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे. छत्तीसगडमधील सीमावर्ती भागात नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सुरक्षा दलांनी मोठं अभियान सुरू केलं आहे. आज या भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू करण्यात आला. या चकमकीत नऊ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा दलांचे सर्व जवान सुरक्षित आहेत.

पश्चिम बस्तर डिविजनला या भागात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. याच दरम्यान नक्षल्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. यानंतर सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की येथील पाच ते सात किलोमीटर जंगलाच्या परिसरात जवळपास 65 नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. याची माहिती मिळाल्यानंतर दंतेवाडा आणि बीजापूर जिल्हा पोलीस आणि सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे अभियान राबवले. रात्रीच्या वेळी जवान याठिकाणी पोहोचले. त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली.

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : नारायणपूरच्या जंगलात सात नक्षलवादी ठार

या भागात अजूनही चकमक सुरूच आहे. चकमक संपल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल. या चकमकीत नक्षलवादी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. यांची माहिती सध्या गोळा केली जात आहे. या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. तसेच काही हत्यारेही मिळून आली आहेत. याबाबत आधिक माहिती सुरक्षा दलांकडून गोळा केली जात असल्याचे सांगण्यात आले.

वर्षभरात 112 नक्षलवाद्यांना कंठस्नान
गेल्या वर्षभरापासून छत्तीसगडमधील बस्तर भागात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने अनेक कारवाया केल्या आहेत. गेल्या वर्षात 112 नक्षलवाद्यांच्या मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच 10 मे रोजी विजापूरच्या एका गावात चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले होते. तर 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले होते.तर 16 एप्रिल रोजी कांकेरमध्ये 29 जण ठार झाले. परंतु सुरक्षा दलावर काही आरोप झाले आहेत. विजापूरमध्ये मारलेले गेले निर्दोष गावकरी होते, असा आरोप ग्रामस्थ आणि अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा, शोधमोहिम सुरू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube