छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : नारायणपूरच्या जंगलात सात नक्षलवादी ठार

  • Written By: Published:
छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : नारायणपूरच्या जंगलात सात नक्षलवादी ठार

Seven Naxalites killed in encounter with forces in joint ops in Bastar रायपूर: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) बस्तर भागात नक्षलवाद्यांविरोधात ( Naxalites) गेल्या काही दिवसांपासून जोरदार कारवाई सुरू आहे. गुरुवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. विजापूरच्या सीमेला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलाने एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे.

कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?

नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर या तीन जिल्ह्यातील सुरक्षा दलाने एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि विशेष टास्क फोर्सने संयुक्तपणे ही कारवाई केल्याची माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. हे एक संयुक्त आंतरजिल्हा ऑपरेशन होते आणि रेखावाया जंगलाजवळ झालेल्या दोन चकमकीत, नारायणपूर सैन्याने दोन मृतदेह आणि दंतेवाडा दलाने पाच नक्षलवादी गणवेशधारी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच सात अत्याधुनिक शस्त्रे ही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राय यांनी दिली.

इलेक्टोरल बाँड्समुळे चर्चेत आल्याला मेघा इंजिनीअरिंगला महाराष्ट्रात अनेक मोठी कंत्राट…

हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि सात नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केलेल्या शस्त्रांसह तळावर आणले जात आहेत. चकमक सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या संपर्कात असल्याने अधिक तपशील लवकरच समोर येतील. काही जवान मृतदेह आणि शस्त्रे घेऊन जंगलीतून परत येत आहेत. तर काही जवान अजूनही जंगलात असून, उशीरापर्यंत चकमक सुरू आहे. त्यामुळे आणखी नक्षलवादी ठार झाले असल्याचे बोलले जात आहे. या चकमती ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख शुक्रवारी समोर येईल, अशी माहिती नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी दिली.

वर्षभरात 112 नक्षलवाद्यांना कंठस्नान

गेल्या वर्षभरापासून छत्तीसगडमधील बस्तर भागात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने अनेक कारवाया केल्या आहेत. गेल्या वर्षात 112 नक्षलवाद्यांच्या मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच 10 मे रोजी विजापूरच्या एका गावात चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले होते. तर 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले होते.तर 16 एप्रिल रोजी कांकेरमध्ये 29 जण ठार झाले. परंतु सुरक्षा दलावर काही आरोप झाले आहेत. विजापूरमध्ये मारलेले गेले निर्दोष गावकरी होते, असा आरोप ग्रामस्थ आणि अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज