नक्षलविरोधी मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलविरोधी मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli Naxal Attack : राज्यात आज लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये एक कमांडर तर दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

 

AK 47 कारबाईन, इन्सास राफाईल्सचा वापर

या घटनेबाबत सुत्रांच्या माहितीनुसार पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू याच्यासह अन्य दोनजण या चकमकीत ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिला नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच, या कारवाईत त्यांच्याकडून AK 47 कारबाईन, इन्सास राफाईल्स ही अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

 

दोन पथकं घटनास्थळी रवाना

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार भामरागड तालुक्यातलं कत्रांगट्टा गावाजवळ काही नक्षलवादी जंगलात तळ ठोकून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली. हे नक्षलवादी काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचीही खबर होती. तसंच, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यातीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. या दरम्यान, शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका कमांडरसह दोन महिला नक्षलवादी ठार झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज