छत्तीसगडमध्ये मोठं ऑपरेशन! चकमकीत बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी

छत्तीसगडमध्ये मोठं ऑपरेशन! चकमकीत बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी

Chhattisgarh Encounter : छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा (Chhattisgarh Encounter) दलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज जवळपास बारा नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. या घटनेबाबत यापेक्षा आधिक माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडिया गावाजवळ सुरक्षा दलांचे एक पथक कामगिरीवर होते. याच दरम्यान येथील एका जंगलाजवळ चकमकीला सुरुवात झाली. यानंतर गोळीबारात सुरक्षा दलाच्या जवानांनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत सुरक्षा दलाचे सर्व जवान सुखरुप बचावले आहेत. या व्यतिरिक्त जास्त माहिती मिळाली नाही.

महादेव अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला छत्तीसगडमधून उचलले

सुरक्षा दलाचे जवान अजूनही या भागात शोधमोहिम राबवत आहेत. याआधी १६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २९ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले होते. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियानांपैकी सुरक्षा दलांची ही सर्वात मोठी कारवाई होती. कांकेरमधील छोटेबैठिया येथील चकमक स्थळावरून 29 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. या चकमकीत 3 जवानही जखमी झाले होते.

पोलिसांना या परिसरात गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली.  १६ एप्रिल रोजी दुपारी कांकेर जिल्ह्यातील छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार दरम्यानच्या हापटोला जंगलात ही चकमक बीएसएफ आणि डीआरजी आणि माओवाद्यांच्या संयुक्त दलामध्ये झाली होती.  तसेच बिजापूर जिल्ह्यातील कोरचोली आणि लेंड्रा येथील जंगलात झालेल्या चकमकी पोलिसांन १३ नक्षलवाद्यांना ठार केले होते. इतकेच नक्षलवादी जखमी झाले होते.

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई! मोस्ट वॉन्टेड कमांडरसह 29 नक्षलवादी ठार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज