गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, भामरागड जिल्ह्यात चार नक्षलींना कंठस्नान

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, भामरागड जिल्ह्यात चार नक्षलींना कंठस्नान

Gadchiroli Police : गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भामरागड (Bhamragadh) जिल्ह्यात गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) मोठी कारवाई करत 4 नक्षलींना चकमकीत ठार केले आहे. जवळपास चार तास चालेल्या या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. माहितीनुसार, सध्या घटना स्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्यातील (Kawande Police Station) हद्दीतील ही घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कवंडे पोलीस ठाण्यातील हद्दीत नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.

मागच्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नक्षलवाद्यांविरोधात मोहिम सक्रिय करण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस देखील अलर्ट मोडवर असून आज झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी पोलिसांनी ठार केले आहे. ज्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांनी काल रात्रीपासूनच नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली होती. तर आज गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 नक्षलवादी ठार करण्यात आले आहे.

चांगल्या झोपेसाठी तोंडावर पट्टी लावणं… बेतू शकतं जीवावर; तज्ज्ञांनी ‘या’ ट्रेंडला म्हटलंय धोकादायक

तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये (Narayanpur) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 26 पेक्षा जास्त नक्षलवादी मारले गेले होते. या चकमकीच एक जवान देखील शहीद झाला होता. सुरक्षा दलांनी या चकमकीत नक्षलवादी नवबल्ला केशव राव (Navballa Keshav Rao) उर्फ ​​बसवराजू (Basavaraju) याला देखील ठार मारले होते. बसवराजू नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस होता. त्याला डीआरजी (DRG) सैनिकांनी ठार मारले आहे.

धक्कादायक! गुगल मॅपवर बालेवाडीतील क्रीडा संकुलाच्या नावात ‘औरंगजेब’; प्रकरण पोलीस ठाण्यात…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube