चांगल्या झोपेसाठी तोंडावर पट्टी लावणं… बेतू शकतं जीवावर; तज्ज्ञांनी ‘या’ ट्रेंडला म्हटलंय धोकादायक

Mouth Taping Trend Serious Risks Scientists Warning : चांगली झोप येण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. अनेक लोकांना झोपताना नाकाऐवजी तोंडातून श्वास घेण्याची (Health Tips) समस्या जाणवते. यांच्याशीच निगडीत सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड (Mouth Taping Trend) सुरू झालाय. यामध्ये तोंडावर टेप चिकटवला जातो, याचा अर्थ झोपताना (Sleeping Tips) आपल्याकडे नाकातून श्वासघेण्याऐवजी दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. परंतु हा एक जीवघेणा ट्रेंड असल्याचं डॉक्टर म्हणत आहेत.
टिकटॉक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्रेंड व्हायरल होतोय. या ट्रेंडचे नाव माउथ टॅपिंग ट्रेंड आहे. तोंडातून श्वास घेणे रोखण्यासाठी आणि झोपेच्या वेळी अनुनासिक श्वासोच्छवासाला प्रोत्साहन देण्यासाठी (Mouth Taping Trend Risks) तोंडावर टेप लावला जातो. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटी दावा करतात की, तोंडावर टेप लावल्याने चांगली झोप येते. तोंडाचे आरोग्य सुधारते आणि व्यक्ती लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून वाचते.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राहिलं बाजूला; चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्येच जुंपली
इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार यावर अभ्यास करण्यात आलाय. टेप किंवा इतर गोष्टींचा वापर करून तोंड बंद करण्याच्या फायद्यासाठी एकूण 213 रुग्णांचे मूल्यांकन करण्यात आलंय. यावेळी अहवालात काय निष्पन्न झालं, यांसदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.
अहवालात धक्कादायक निष्कर्ष समोर…
– दहापैकी दोन केसमध्ये तोंडावर टेप लावल्याने स्लीप एपनिया असलेल्या काही लोकांमध्ये थोडीशी सुधारणा होऊ शकते. परंतु इतर केसेसमध्ये तोंडावाटे श्वास घेणे, झोपेत अडथळा येणे किंवा स्लीप एपनियावर उपचार करण्यास मदत होते, याचा कोणताही पुरावा आढळला नाही.
6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करा; संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य…
– 10 पैकी चार अभ्यासांनी गंभीर इशारा दिलाय की, ज्या लोकांना नाकाच्या श्वसनमार्गात आधीच अडथळा आहे, म्हणजेच ते नाकातून श्वास घेऊ शकत नाहीत, जर त्यांनी झोपताना तोंड बंद करण्यासाठी टेप वापरला तर त्यांना गुदमरल्यासारखे होऊ शकते.
– शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, नाकात अडथळा येण्याचे कारणताप, सायनोनासल किंवा वाढलेले टॉन्सिल असू शकतात. जर तुम्हाला आधीच यापैकी कोणतीही समस्या असेल आणि तुम्ही या ट्रेंडचे अनुसरण केले तर स्थिती गुदमरण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते.
– अहवालानुसार तोंडावरील टेप अनेक लोकांसाठी योग्य नाही आणि काही प्रकरणांमध्ये आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.
– या व्यक्ती नकळतपणे त्यांचे आरोग्य अजून वाईट करत आहेत. हृदयरोगासारखा गंभीर धोका वाढवत असल्याचं डॉ. रोटेनबर्ग यांनी स्पष्ट केलंय.