निर्लज्जपणाचा कळस!…अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा सुरूच, पश्चाताप नाहीच

निर्लज्जपणाचा कळस!…अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा सुरूच, पश्चाताप नाहीच

Rajendra Hagawane’s arrogance continues After arrest : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम दिसत आहे. जेव्हा पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणलं. तेव्हा ‘तुला पश्चाताप होतोय का?’ असा सवाल त्याला करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) याने नकारार्थी अन् उद्दामपणे हात हलवत नकार दिलाय. अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा सुरूच असल्याचं पाहायला मिळालं.

आपल्या छळाला, मारहाणीला कंटाळून तरूण सुनेनं आत्महत्या केली. तरी त्याबद्दल कोणत्याही पश्चातापाची भावना तर सोडाच उलट उद्दामपणाच करताना राजेंद्र हगवणे (Pune Crime) दिसत होता. निगरगट्टपणा, कोडगे वृत्ती एकूण कशा प्रकारचं हे कुटुंब आहे, हे समोर आलंय. जेव्हा पोलीस या दोघांना बावधन पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यांना वरच्या मजल्यावर घेऊन जात असताना त्याला पश्चाताप होतोय का, असा सवाल विचारला गेला. त्यावेळी त्याने हात हलवून नकारार्थी उत्तर दिलंय.

Vaishnavi Hagawane Case : दिमतीला थार अन् बलेनो, 7 दिवसांत राजेंद्र हगवणेने गाठली 11 ठिकाणं

या कुटुंबाचा इतिहास पाहिला, तर खूप काळापासून दोन्ही सुनांचा छळ, मारहाण होत होती. सासरा असून देखील लेकींप्रमाणे असणाऱ्या सुनांना त्याने मारहाण केली. जेव्हापासून घटना घडली, तेव्हापासून तो फरार होता. लॉजवर राहिला, हॉटेलमध्ये मटन खाल्लं. एकीकडे हा गदारोळ उडत होता अन् दुसरीकडे मात्र राजेंद्र हगवणे हा जीवाची चैन करताना दिसून आलाय.

मातंग समाजाचा आक्रोश! आरक्षण उपवर्गीकरणासाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्र्यांना तातडीचे पत्र

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केलंय. अजित पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. जर ते दोषी आढळले तर त्यांना फाशी देण्यात यावी, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी वैष्णवीच्या सासऱ्याला पक्षातून काढून टाकले आहे.

अजित पवार यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, अशा वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांना माझ्या पक्षात स्थान नाही. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन करून कठोर कारवाई करण्यास सांगितले. 23 वर्षीय वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांचा दोन नंबरचा मुलगा शशांक यांची पत्नी होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube