कैद्यांकडून 550 कोटी, लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, IPS सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक प्रताप!

कैद्यांकडून 550 कोटी, लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, IPS सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक प्रताप!

Jalindar Supekar Demands 500 Crore Bribe From Criminal : हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) डिमोशन झालेले आयपीएस जालींदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. कालच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं समोर आलंय. जालिंदर सुपेकर विशेष महानिरीक्षक (कारागृह) पदावर कार्यरत असताना त्यांनी अमरावतीच्या कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड (Pune Crime) आणि गणेश गायकवाड यांना जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केलाय.

550 कोटी मागितल्याचा खळबळजनक आरोप

जालिंदर सुपेकरच्या विरोधात याचिका करणारे वकील निवृत्ती कराड यांनी म्हटलंय की, मी सुरूवातीपासून या केसमध्ये काम पाहत आहे. या प्रकरणात पहिल्या रिमांडपासून सुपेकर यांनी रिकव्हरीमध्ये भ्रष्टाचार केला आहे. गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार केला, असा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला.

‘त्याच्या शरीराचे तुकडे करू नका…’ बेंगळुरू चेंगराचेंगरीत एकुलत्या एका मुलाचा मृत्यू, वडिलांनी फोडला टाहो

धमकावलं अन् मारहाण… 

नानासाहेब आणि गणेश गायकवाड येरवाड्यातून अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं होतं. अमरावतीला वर्ग केल्यानतंर जालिंदर सुपेकर जेलचे उपमहानिरीक्षक असताना त्यावेळी त्यांनी 2024 मध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना धमकावलं. त्या दोघांना सुपेकरांनी यांनी मारहाण दाखल केली होती.

उद्धव ठाकेर यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का; पाच ते सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

पाच ते सहा कर्मचारी निलंबित

गायकवाड पिता-पुत्राला टॉर्चर करा, असं जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील मिराशे, भोसले अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही म्हणून सुपेकरांनी अधिकारांचा वापर केला. त्यांनी अमरावती कारागृहातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. जेलमध्ये सोलापूरच्या एका कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केला होता. यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता, असं देखील वकील निवृत्ती कराड यांनी म्हटलंय.

सुपेकरांनी गायकवाड पिता-पुत्रांना म्हटलं होतं की, मला 500 कोटी रुपये द्या, तुम्हाला जामीन मिळवून देतो. हे सगळं मीच केलं असून तुम्हाला अडकवले आहे. मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढून देतो. नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी जालिंदर सुपेकर यांनी दिली होती, असा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube