वैष्णवी हगवणे प्रकरण जालिंदर सुपेकरांना भोवले! विशेष पोलिस महानिरीक्षकपद काढले, होमगार्डला बदली

Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar), विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांची पद अवनत करुन उप महासमादेशक, होमगार्ड पदावर बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधूंचे मामा आहे. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया (Anjali Damania) यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
हगवणे बंधूंना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना देण्याचा तसेच कैद्यांना द्यायच्या साहित्या कथित 500 कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप जालींदर सुपेकर यांच्यावर करण्यात आला आहे. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना ज्याने बंदुक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवाना दिल्याचं आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी केला आहे. या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचा नाव आल्याने त्यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता तर आता पद अवनत करुन त्यांची बदली उप महासमादेशक, होमगार्ड पदावर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आज वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक केली आहे. निलेश चव्हाण याला आज मध्यरात्री विमानाने पुण्यात आणले जाणार आहे.
प्रकरण काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती.
लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे.
Maruti Suzuki देणार Tata ला धक्का; बाजारात लॉन्च करणार ‘ह्या’ कार्स