‘वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न…’, वडील अनिल कस्पटेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप

‘वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न…’, वडील अनिल कस्पटेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप

Anil Kaspate On Vaishnavi Hagawane Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण (Vaishnavi Hagawane Case) गाजत असून या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) , दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंदला अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात 28 मे रोजी पुणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पाडली. या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांंनी वैष्णवी हगवणे यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती आणि आम्ही ते पकडले होते. योग्यवेळी चॅट समोर आणू असा युक्तीवाद केला होता. तर आता या प्रकरणात वैष्णवी यांचे वडील अनिल कस्पटे (Anil Kaspate) यांनी पत्रकार परिषद घेत हगवणें कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न जमलं होते मात्र हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुटले. त्यामुळे नाईलाजाने मला मुलीचे लग्न करावे लागले. असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हगवणेंच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 28 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान हगवणेंच्या वकिलांनी आमच्याकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याने आम्ही 40 लाखांच्या एका फॉर्च्यूनरसाठी वैष्णवीला कशाला छळू असा युक्तीवाद केला होता.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल कस्पटे यांनी वकिलांचा हा दावा खोडून काढला. आरोपींकडे पाच कोटींच्या गाड्यानसून आम्ही दिलेलीच गाडी आहे. लग्नाआधी एमजी हेक्टर (MG Hector) गाडी बुक करण्यात आली होती. पण त्यांनी धमकी देत फॉर्च्यूनर (Fortuner) गाडी घ्यायला लावली असा दावा देखील अनिस कस्पटे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

पुणेकरांनो! वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांची पावती थेट एआय फाडणार

तसेच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आत्महत्येपूर्वी वैष्णवीला पाच ते सहा दिवस मारहाण करण्यात आली होती असा गंभीर आरोप देखील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube