नको त्या व्यक्तीसोबत चॅट, फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर आता आज पुणे न्यायालयात या प्रकरणात (Vaishnavi Hagawane) सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान एकाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही असा युक्तीवाद राजेंद्र हगवणेंच्या (Rajendra Hagawane) वकिलाने केला आहे. तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरु होते आम्ही ते पकडले होते. असा युक्तीवाद देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. तर आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीचा कशाला छळ करु? असं देखील आज पुणे न्यायालयात (Pune Court) राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.
तर या प्रकरणातील आरोपींचे अद्याप मोबाईल सापडले नाही. तसेच वैष्णवीला मारहाण करण्यात आलेली हत्यारे, रॉड हस्तगत करायचे आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. या युक्तीवादानंतर या प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला एका दिवसाची पोलिस कठोडी सुनावण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे याला 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
आज झालेल्या सुनावणीत आरोपींना पोलिस कोठडीची काहीच गरज नाही. गहाण ठेवलेले 51 तोळे सोने कुठल्या बँकेत आहेत याची माहिती आधीच आमच्याकडून देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणाने (Nilesh Chavan) बाळाचा सांभाळ केला पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचा युक्तीवाद राजेंद्र हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.
तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चँट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. असं देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही.
Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
तसेच आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला हॅरेसमेंट करु? या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरु असल्याचा दावा देखील राजेंद्र हगवणेच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.