‘जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटींची मागणी’, हगवणे प्रकरणातील सुपेकरांबाबत धसांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas Allegations On Jalindar Supekar Vaishnavi Hagawane Case : भाजप आमदार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांनी जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. आयजी पोस्टवर असलेला माणूस (Vaishnavi Hagawane Case) 1 लाख रुपये रोख घेतो. 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे? असं देखील आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
हगवणे बंधूंना जो शस्त्र परवाना मिळाला होता. त्यावर सुपेकर यांची सही असल्याचं समोर आलंय. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी असून त्यांनी लाच घेतल्याचे देखील आरोप केले जात आहेत. आता भाजप आमदार सुरेश धस यांनी (Pune Crime) देखील त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले – सुरेश धस #VaishnaviHagawane #SureshDhus @Dev_Fadnavis @RRPSpeaks @anjali_damania pic.twitter.com/8pFlenHQzG
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 4, 2025
सुपेकर 100 टक्के फॉल्टी
नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता म्हणजे अर्थ सुपेकर 100 टक्के फॉल्टी आहे. नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नसून किती खालच्या थराला गेले, याचं उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची 150 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. ती प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची? असं देखील सुरेश धस यांनी विचारलं आहे. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे. भविष्यात आष्टी मतदार संघामध्ये हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असं आवाहन देखील धस यांनी केलंय.
तर आयपीएस जालींदर सुपेकर यांनी आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास नकार दिला आहे. आमदार धस यांनी केलेले आरोप आपणाला माहिती नाही, असं सुपेकर यांनी म्हटलं आहे.
सुपेकरांचे डिमोशन झालं
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुपेकरांचा संबंध आढळला. त्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर त्यांच्यावर कारवाई केली. सुपेकर विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह अन् सुधार सेवा पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड पदावर पाठवण्यात आलंय.