Maruti Suzuki देणार Tata ला धक्का; बाजारात लॉन्च करणार ‘ह्या’ कार्स

Maruti Suzuki देणार Tata ला धक्का; बाजारात लॉन्च करणार ‘ह्या’ कार्स

Maruti Suzuki Upcoming Cars : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी बाजारात पुढील काही वर्षात जबरदस्त कार्स लॉन्च करणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स, बेस्ट मायलेज आणि पावरफुल इंजिन पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, कंपनी पुढील दोन – तीन वर्षात भारतीय बाजारात ह्या कार्स लॉन्च करणार आहे.

Maruti Suzuki eWX

भारतीय बाजारात लवकरच मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी या कारला eWX या नावाने बाजारात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 250 ते 300 किलोमीटर रेंज देणार अशी देखील बाजारात चर्चा सुरु आहे.

Micro SUV

इलेक्ट्रिक कारसह भारतीय बाजारात मारुती सुझुकी टाटाला टक्कर देण्यासाठी एक मायक्रो कार देखील लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार भारतीय बाजारता 2026 च्या अखेरीस लॉन्च करण्यात येणार आहे. बाजारात ही कार टाटा पंचशी (Tata Punch) स्पर्धा करणार आहे. त्यामुळे या कारमध्ये पेट्रोल हायब्रिड इंजिन असण्याची अपेक्षा आहे.

New Generation Maruti Suzuki Baleno

कंपनीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुती सुझुकी बलेनोचा नवीन व्हर्जन 2026 मध्ये कंपनी लॉन्च करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारमध्ये नवीन डिझाइन तसेच सुधारित केबिन आणि फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.याच बरोबर या कारमध्ये शक्तिशाली हायब्रिड पॉवरट्रेन असेल.

Maruti Suzuki Hatchback Car

बलेनोसह मारुती सुझुकी एंट्री-लेव्हल सेगमेंटसाठी नवीन हॅचबॅक कार लॉन्च करण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर आली. या मॉडेलमध्ये हायब्रिड, सीएनजी आणि फ्लेक्स-फ्युएलसह अनेक इंजिन पर्याय असू शकतात.

धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आता…, ‘त्या’ प्रकरणात पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया 

Maruti Suzuki Fronx Hybrid

तर समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी आता मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिडवर देखील काम करत आहे. ही कार देखील भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. अनेकदा ही कार टेस्टींग करताना देखील दिसली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube