पत्नीचा कर्करोगाने मृत्यू! काही मिनिटांतच आयपीएस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

पत्नीचा कर्करोगाने मृत्यू! काही मिनिटांतच आयपीएस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

IPS Shiladitya Chetia suicide : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया यांनी गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीचा याच रुग्णालयात कर्करोगाने मृत्यू झाला होता. (IPS) चेतिया हे आयपीएस अधिकारी होते. (suicide) त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकही मिळालं होतं.

चेतिया यांनी स्वत:वर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली त्याआधी काही मिनिटांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग करण्यापूर्वी, चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचं पोलिस अधीक्षक (एसपी) आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचं कमांडंट म्हणूनही काम केलं होतं. चेतियांची पत्नी दीर्घकाळ कर्करोगाने त्रस्त होती आणि गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मोठी बातमी : हाकेंची प्रकृती चिंताजनक; रक्तदाब वाढल्याने ब्रेन हॅमरेजची डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. येथील नेमकेअर हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 4.25 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या 10 मिनिटांनंतर आयपीएस अधिकारी चेतिया यांनीही या जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी विनंती केली की, त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करायची आहे, म्हणून त्यांना काही काळ एकटे सोडावं. यानंतर त्यांना एकटं सोडण्यात आलं. त्याचदरम्यान त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे अपघाताची पुनरावृत्ती! खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या लोकांना चिरडलं; एकाचा मृत्यू, जामीनही मिळाला

गोळीचा आवाज ऐकला तेव्हा आम्ही धावलो. पुढे पाहिलं तर चेतिया आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले आढळले असं नामकेअरचे व्यवस्थापकीय संचालक हितेश बरुआ यांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. दरम्यान, त्यांच्या पत्निची तीन दिवसांपूर्वीच प्रकृती खालावली होती. ते अस्वस्थ वाटत होते. त्यांचं 12 मे 2013 रोजी त्यांचे लग्न झालं होत. अद्याप त्यांना मूलबाळ नव्हतं असंही बरुआ यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज