शेअर बाजार अन् कर्जबाजारीपणाचा बळी; हातात हात घेत रेल्वे ट्रॅकवर पिता-पुत्रांनी संपवलं जीवन

शेअर बाजार अन् कर्जबाजारीपणाचा बळी; हातात हात घेत रेल्वे ट्रॅकवर पिता-पुत्रांनी संपवलं जीवन

Father Son suicide in front train in Mumbai due to Share Market Loss : मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकावर एका वडिल मुलाच्या जोडीने रेल्वेखाली आत्महत्या (Father Son suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या दोघांनी कर्जबाजारीपणाला (Share Market Loss) कंटाळून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तसेच या मृतांची ओळख देखील पटली असून हरिश मेहता (वय 60) आणि जय मेहता (वय 32) अशी या मृत पिता-पुत्रांची नावं आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

तर या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही पिता पुत्राची जोडी भाईंदर स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर चालत जात आहेत. तेवढ्यात समोरून फास्टट्रॅक वरून चर्चगेटला जाणारी ट्रेन येते. ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये म्हणून अगोदर शेजारच्या ट्रॅकवर चालत असलेली हे पिता-पुत्र अचानक चर्चगेट लोकलच्या ट्रॅकवर एकमेकांचा हात हातात धरून ट्रेनच्या समोर जात ट्रॅकवर झोपली. ट्रॅकवर झोपताना त्यांनी त्यांचे डोके रुळावर अशा पद्धतीने ठेवले होते की, दोघांच्याही डोक्यावरून ट्रेन गेल्याने अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधकांत धुमश्चक्री; नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्सनाच बोलावले पण..

त्यामुळे सुरुवातीला या मृतदेहांची ओळख पटणे ही अवघड झालं होतं. मात्र खिशात सापडलेल्या आधार कार्ड वरून या दोघांची ओळख पटली. दरम्यान प्राथमिक तपासात या पिता-पुत्रांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कारण वडिल हरिश मेहता मुंबई शेअर मार्केटमध्ये कामाला होते.

तर मुलगा डीटीपी ऑपरेटर होता हे कुटुंब वसईत राहत होतं वर्षभरापूर्वीच या मुलाचे लग्न देखील झालं होतं. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी प्रचंड कर्ज काढलेलं होतं. याच कर्जाला कंटाळून या दोघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे तर सध्या या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज