राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

Dearness Allowance : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) 4 टक्क्याने वाढ करण्यात आली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यासोबतच 1 जानेवारी 2024 पासून ते 30 जानेवारीपर्यंतची थकबाकीदेखील जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीयं.

‘सच कह रहा है दिवाना’ ते ‘सारी दुनिया जला देंगे’ बी प्राकच्या जुन्या क्लासिक गाण्याची एक झलक

सरकारकडून वर्षभरात दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जात असते. आधी केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जातो त्यानंतर राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येतो. यामध्ये 1 जुलैपासून सरकारी, निम-सरकारी, आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारीपासून ते जूनपर्यंत अशा सहा महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला

सरकारकडून याआधी 23 नोव्हेंबर 2023 रोजी अखेरची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के होता, तेव्हा 4 टक्क्याने वाढवून 46 टक्क्यांपर्यंत हा भत्ता करण्यात आला. आता 46 टक्क्यांवरुन थेट 50 टक्क्यांपर्यंत वाढ झालायं.

लक्षात ठेवा! सहमतीने सेक्सचं वय 16 नाही तर… सुप्रीम कोर्टानेही पुन्हा दिली आठवण

दरम्यान, राज्य सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. तर जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्टच मिळाल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube