महापालिका, झेडपीसाठी शिंदेंनी रसद जमविली ! ‘या’ सात ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली
shivsaink left Uddhav Thackeray group : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MahaVikas Aghadi) आपला करिश्मा दाखविता आला नाही. राज्यातील मतदारांना उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस व शरद पवार गटाला सपशेल नाकारले आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. मतदार हे महायुतीवर खूश असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात रसद जमविण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाची सात ठिकाणचे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केलाय.
उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांन ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘…तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत’; सुरेश धस यांचा इशारा
राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले.
‘एसआयटीमध्ये वाल्मिक कराडचेच पोलीस…’; पुरावे देते आव्हाडांचे तपासावरच पश्नचिन्ह
कुणी ठाकरेंची साथ सोडली ?
यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे. दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली. यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवा सेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी पक्षप्रवेश केला.
धुळ्यात जिल्हाप्रमुखच फुटला
धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी. तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीणमधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.