‘…तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत’; सुरेश धस यांचा इशारा

‘…तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत’; सुरेश धस यांचा इशारा

Suresh Dhas : सरपंसंतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलेच तापलं. धस यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर गंभीर आरोप केला. पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि त्यानंतर निवडणुकीसाठी कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप धस यांनी केला. तसेच मुंडेही या गुन्हात येतील, ते काय ब्रम्हदेव नाहीत, असंही धस म्हणाले.

संतोष देशमुख हत्याकांड: सांगळे, आंधळे, घुले गुजरातला कसे गेले ? कुठे-कुठे लपले, कुणी मदत केली? 

पुण्यात आज धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. खंडणी प्रकरण आणि बीड हत्या प्रकरणावरून मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होतेय. त्यावर बोलतांना धस म्हणाले की, या प्रकरणात मुंडेंचा किती सहभाग आहे, हे तपासून पाहावं. सहभाग असेल तर कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडे काय ब्रह्मदेव नाहीत. सहभाग असेल तर तेही या गुन्ह्यात येतील. काही लोक म्हणतात मुंडेंनी नेतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मात्र नैतिकता आणि मुंडे यांची काही गाठ राहिलेली नाही, अशी टीका धस यांनी केली.

‘एसआयटीमध्ये वाल्मिक कराडचेच पोलीस…’; पुरावे देते आव्हाडांचे तपासावरच पश्नचिन्ह 

पुढं धस म्हणाले की, वाल्मिक कराड आणि नितीन बिक्कड यांची 14 जूनपूर्वी ओळख झाली होती. 14 जून रोजी कराड, बिक्कड आणि अनंत काळकुट्टे यांची परळी येथील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तसेच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला घेऊन बिक्कड परळीला वाल्मिक कराडकडे गेला होता. त्याचवेळी मुंडेंचे जोशी नावाच्या पीएममार्फत बिक्कड थेट धनंजय मुंडेंना भेटला. त्यानंतर 19 जूनला मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी, वाल्मिक कराड, बिक्कड यांच्यात बैठक पार पडली. याबैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीने तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना निवडणुकीसाठी तातडीने 50 लाख रुपये देण्याची मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने त्यांना 50 लाख रुपये दिले. हे पैसे धनंजय मुंडे यांनी घेतले की वाल्मिक कराड यांनी घेतले हे मला माहीत नाही. मात्र, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठका झाल्या, असा आरोपही धस यांनी केला.

वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार नितीन कुलकर्णी हे 17 मोबाईल नंबर वापरतात. कराडच्या आत्मसमर्पणापासून नितीन कुलकर्णी फरार आहे. मात्र मी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या डीजी यांना विनंती करतो की या नितीन कुलकर्णीला अटक करा, कोणा-कोणाकडून किती पैसे घेतले आहेत ते तुम्हाला या 17 नंबरच्या तपासणीत सापडेल, असं धस म्हणाले. नितीन बिक्कड याला उचललं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असंही धस म्हणाले.

…तर राजकारण सोडून देईल
ते म्हणाले, मी जे सांगितलं आहे त्यातील जर खोटं चुकीचं निघालं तर मी राजकारण सोडून देईल. माझी अजितदादांना विनंती आहे की, दादा महाराष्ट्र तुमच्याकडे चांगला नेता म्हणून पाहतोय. तुमचं काय अडकलंय मुंडेंकडे? हे चुकीचे लोक आहे. तुम्ही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, असं धस म्हणाले.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube