संतोष देशमुख हत्याकांड: सांगळे, आंधळे, घुले गुजरातला कसे गेले ? कुठे-कुठे लपले, कुणी मदत केली?
Sarpanch santosh deshmukh case-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडांच्या तपासाला वेग आलाय. हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पकडले गेले असून, ते आता सीआयडी (CID) कोठडीत आहेत. यातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. घुले, सांगळे व आंधळे हे तिघेही एकाच वेळी फरार झाले होते. देशमुख यांची हत्या केल्यानंतर तिघेही कुठे फरार झाले होते. फरार झाल्यानंतर तिघांनाही कुणी मदत केली याचा उलगडा आता एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडीचे तपासी अधिकारी अनिल गुजर हे करत आहे.
‘एसआयटीमध्ये वाल्मिक कराडचेच पोलीस…’; पुरावे देते आव्हाडांचे तपासावरच पश्नचिन्ह
त्यातील काही गोष्टी आता बाहेर आल्या आहेत. 9 डिसेंबर रोजी केजजवळील टोलनाक्याजवळून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे (Krushna Andale) हे फरार झाले होते. या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर तिघेही पसार झाले. ते मुंबईकडे निघून गेले होते. सुदर्शन घुले याच्याच टाकळी गावातील एक मुलगा भिवंडीमधील एका राजकीय नेत्याच्या हॉटेल व बारमध्ये नोकरीला आहे. सुदर्शन घुलेने त्या मुलाला संपर्क केला आणि त्याला भेटायला भिवंडीला गेला. मुलाला भेटल्यानंतर दोन मिनिटाने तो वॉशरुमला जावून येतो, सांगून गेला आणि तो पुन्हा आला. त्यावेळी त्याच्याबरोबर सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोघेही होते. संतोष देशमुख हत्याकांडाची माहिती त्या मुलाला मिळाली होती. तसेच तिघेही गुन्हेगारी पाश्वभूमीचे असल्याने त्याने त्यांच्याशी जास्त काही चर्चा केली नाही.
मुख्यमंत्री साहेब पाया पडतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; पुण्यातल्या मूक मोर्चात सुरेश धस यांची मागणी
इकडे राज्यात संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तापत होते. आपण पकडले जाऊ म्हणून तिघांनी थेट राज्य सोडले. तिघांनीही थेट गुजरात गाठले. गुजरामधील गिरणार या भागात तिघेही एका मंदिराच्या भक्तनिवासात राहत होते. तब्बल पंधरा दिवस ते भक्तिनिवासात राहत होते. तेथे राहणे स्वस्त आणि जेवण फुकट होते. पैसे संपल्यानंतर कृष्णा आंधळे एका व्यक्तीकडे पैसे आणायला गेला. पण दोन दिवसानंतर कृष्णा आंधळे परत आला नाही. संतोष देशमुख हत्याप्रकरणात काय काय घडलं हे त्यांनी दुसऱ्या एकाचा युट्यूबवरही बघितले. दोन दिवस आंधळे ना आल्याने तो पकडला गेला असा अर्थ सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांनी काढला. त्यानंतर दोघेही महाराष्ट्रात आले.
त्यानंतर आरोपी सुदर्शन घुले याने ओळखीचे डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी सुरेखा वायबसे यांच्याशी संपर्क साधला आहे. काही पैशाची मदत आणि न्यायालयीन मदत वायबसे यांच्याकडे मागितल्याचे बोलले जात होती. आरोपींना संपर्क केल्याने वायबसे पती-पत्नीही धारूर तालुक्यातून निघून गेले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही केरळला गेलो असे सांगितले. पण ते सीआयडी पथकाला नांदेडमध्ये सापडला. तेथून तिन्ही आरोपींचा सापडण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही पुण्यातील बालेवाडी भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, दोघांनाही चौदा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे.
एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आता सांगळे आणि घुलेकडे कसून चौकशी करत आहे. आरोपींना पळून जाण्यास कुणी मदत केली, ते तिघे गुजरातमध्ये कसे गेले, तेथून पुन्हा महाराष्ट्रात कसे आले. कोणी आर्थिक मदत केली. कृष्णा आंधळे कुठे आहेत. या अँगलने तपास सुरू आहे.