विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला

विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला

Ashok Chahvan with Manoj jarange criticize opposition : नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल होत राज्यसभेचे खासदार झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्व मुद्दे राज्यसरकारसमोर मांडले. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांना टोला (criticize opposition) देखील लगावला आहे.

घटस्फोटित मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर समाजमाध्यमांमधून त्यांनी ही माहिती दिली. खा. चव्हाण म्हणाले की, मराठा उमेदवार व विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने 28 जून रोजी निर्गमित केलेल्या शुद्धीपत्रकामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत स्पष्टता आणण्याची आवश्यकता आहे.

Maratha OBC Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण मंजूर करून सार्वजनिक आरोग्य, पोलीस, उर्जा आदी विभागांसह राज्य लोकसेवा आयोगाच्या नोकरभरतीत तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशप्रक्रियेत ते लागू केले आहे. मात्र, अद्यापही मराठा आरक्षण मिळालेच नसल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात असून, समाजाला अधिकाधिक लाभ देण्याच्या अनुषंगाने पावले उचलावीत.

मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू आहे. आजवर किती व नेमके कोणते गुन्हे मागे घेण्यात आले, याविषयी माहिती देण्याची तसेच गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही अधिक गतीमान करण्याची मागणी आपण या बैठकीत मांडली. या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाबाबत भूमिका व सूचना मांडण्याची संधी विरोधी पक्षांकडे होती. मात्र, महाविकास आघाडी या बैठकीला गैरहजर राहिल्याचेही अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज