खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; केंद्र सरकारकडून दिवाळी गिफ्ट

Dearness Alllowance Hike

Dearness allowance hike : केंद्र सरकारकडून सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देऊ शकतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून वाचवण्यासाठी रक्कम दिली जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारक मिळून 1.2 कोटी जणांना होतो.

Video : प्रदेशाध्यक्षपदासाठी माझं नाव 2014 पासूनच चर्चेत पण…, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा मोठा खुलासा

दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार (Central Government) महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवू शकतं. सध्या महागाई भत्ता 55 टक्के इतका आहे. जर त्यामध्ये 3 टक्के वाढ केली तर तो 58 टक्क्यांवर जाईल. जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू केला जाईल.‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार हा फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.

मोठी दुर्घटना! गुजरातमधील शक्तीपीठ पावगडमध्ये रोपवे तुटला; ६ जणांचा जागीच मृत्यू

महागाई भत्ता वर्षात दोनदा वाढवला जातो

सरकार (Central Government) एका वर्षात दोन वेळा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवते. जानेवारी ते जून या कालावधीसाठी जानेवारीत तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. गेल्यावर्षी केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भात घोषणा केली होती. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर 2024 ला महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्यात आल्याची घोषणा झाली होती. यंदा दिवाळी 20-21 ऑक्टोबरला आहे.

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! इव्हीएमऐवजी आता मतपत्रिकांवर निवडणुका; पण नियम काय सांगतात?

महागाई भत्ता कसा ठरवला जातो?

सातव्या वेतन आयोगानुसार ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता (Dearness Allowance) निश्चित केला जातो. हा फॉर्म्युला 12 महिन्यांच्या सरासरीच्या आकडेवारीवर आधारित असतो. जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान सीपीआय-आयडब्ल्यू 143.6 होता. जो 58 टक्के महागाई भत्त्याच्या बरोबर आहे. याचा अर्थ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत केंद्र सरकार (Central Government) कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3 टक्के वाढवून देऊ शकतं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार; ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

सातव्या वेतन आयोगानुसार वाढणारा हा शेवटचा महागाई भत्ता (Dearness Allowance) असेल. कारण सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. सरकारनं (Central Government) जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube