खुशखबर! सरकारी कर्मचारी मालामाल होणार; DA थेट 53 टक्क्यांवर, ‘या’ 7 महिन्यांचा सुद्धा पगार मिळणार

खुशखबर! सरकारी कर्मचारी मालामाल होणार;  DA थेट 53 टक्क्यांवर, ‘या’ 7 महिन्यांचा सुद्धा पगार मिळणार

State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) खुशखबर आहे. महागाई भत्यात तीन टक्के वाढ करण्यात आलीय. आता महागाई भत्ता 50 टक्क्यांहून थेट 53 टक्क्यांवर पोहोचलाय. 1 जुलै 2024 पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. जुलै 2024 पासूनची थकबाकी या महिन्याच्या पगारात जमा होणार असल्याचं देखील समोर (State Government Employees DA Increased) आलीय. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती मिळतेय.

शासन निर्णयात म्हटलंय की, राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई (dearness allowance) भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक 1 जुलै, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरुन 53% करण्यात यावा. हा महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै, 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

रात्रीस खेळ चाले! हो, बावनकुळेंना भेटलो; जयंत पाटलांनी उलगडली 25 मिनिटांच्या भेटीची ‘स्क्रिप्ट’

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहे, त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था अन् जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

कानडा राजा पंढरीचा! श्रोते मंत्रमुग्ध, राहुल देशपांडेंना ईशा यक्ष महोत्सवात मिळालं स्टँडिंग ओव्हेशन

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 50 टक्के असलेला महागाई भत्ता 53 टक्के करण्यात आलाय. या निर्णयाचा राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झालीय.  फेब्रुवारीच्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाढीव पगार मिळेल, असं सांगितलं जातंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube