कृष्णा खोपडे तोंडावर पडले…; विधानसभेत वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट

कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांना त्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट.

  • Written By: Published:
Untitled Design (100)

Clean chit given to senior civil servant Tukaram Mundhe in the Legislative Assembly : राज्यसेवेत कर्तव्यनिष्ठ आणि पारदर्शक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या IAS तुकाराम मुंढे(IAS Tukaram Munde) यांना त्यांच्या विरोधात झालेल्या सर्व प्रमुख आरोपांमधून अधिकृत क्लीन चीट मिळाली आहे. नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे(MLA Krushna Khopade) यांनी विधानसभेत मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच धमकी दिल्याचे आरोप उपस्थित केले होते. मात्र, या आरोपांवर झालेल्या चौकशीत त्यांना निर्दोष ठरवण्यात आले.

विधानसभेत मंत्री उदय सामंत यांनी मुंढे यांना क्लीन चीट देण्यात आल्याची घोषणा केली. ईओडब्ल्यू आणि पोलिसांच्या चौकशीमध्येही त्यांच्याविरुद्धचे आरोप असत्य ठरले असल्याचे नमूद करण्यात आले. तथापि, महिला आयोगाच्या चौकशीसंबंधीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असून त्यानंतरच पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल.

‘गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते, गांढूळाणे फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो’; उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र

नागपूर महानगरपालिका आयुक्त पदावर कार्यरत असताना स्मार्ट सिटी प्रकल्पातील काही नियुक्त्या आणि बदली प्रक्रियेवरून मुंढे यांच्यावर अनेक आरोप झाले होते. याशिवाय दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. पहिल्या प्रकरणात, केवळ 21 दिवस नोकरी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यास मातृत्व लाभ कायद्यानुसार आवश्यक असलेली 80 दिवसांची सेवा पूर्ण न केल्याने प्रसूती रजा नाकारण्यात आली होती. दुसऱ्या तक्रारीत, एका महिलेनं मुंढे यांनी अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप महिला आयोगाकडे केला होता, ज्याचा अहवाल प्रलंबित आहे.

मुंढे यांना वारंवार राजकीय दबाव, गैरसमज आणि हस्तक्षेपाचा सामना करावा लागतो, अशी भावना विधानसभेत त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली. तरीही, सध्याच्या क्लीन चीटमुळे त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

follow us