रात्रीस खेळ चाले! हो, बावनकुळेंना भेटलो; जयंत पाटलांनी उलगडली 25 मिनिटांच्या भेटीची ‘स्क्रिप्ट’

रात्रीस खेळ चाले! हो, बावनकुळेंना भेटलो; जयंत पाटलांनी उलगडली 25 मिनिटांच्या भेटीची ‘स्क्रिप्ट’

Jayant Patil Meeting With Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं होत असल्याचं समोर येतंय. लवकरच शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झालीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील (Jayant Patil) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या बैठकीच्या वेळी भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय.

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप येणार असल्याचं दिसतंय. मध्यरात्री एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मध्यरात्री एक तास भेट झाल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (शरद पवार) जयंत पाटील यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू (Maharashtra Politics) आहेत. ते लवकरच भाजपमध्ये येणार अशा देखील चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल त्यांच्यात खलबतं झाल्याने पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

भावी पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी! परळीत नवे पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; धनंजय मुंडेंची माहिती

यावर आता जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलीय. जयंत पाटील म्हणाले की, काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाली. परंतु ही भेट राजकीय नव्हती. आमची भेट 25 मिनिटं चालली. मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झालीय. जवळपास तेरा ते चौदा निवेदनं झाली असं जयतं पाटील म्हणाले आहेत. सोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि शिष्टमंडळ होतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मध्यरात्री एक तास भेट घेऊन चर्चा केलीय. जयंत पाटलांनी बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट झाली. ही भेट व्यक्तिगत कामासाठी झाली, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.

30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर… सुपरस्टार गोविंदाचा सुखी संसार मोडणार? सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चा

मागील काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना जयंत पाटील मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला गेला होता, त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा देखील आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube