Sharad Pawar : उद्योजकांचं कर्ज माफ पण शेतकऱ्यांच नाही; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

Sharad Pawar : उद्योजकांचं कर्ज माफ पण शेतकऱ्यांच नाही; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

Sharad Pawar : 16 उद्योजकांचं 18 हजार कोटी कर्ज माफ पण शेतकऱ्यांचं 2 हजार कोटींचं कर्ज माफ झालं नसल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदींवर केलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात शरद पवारांची सांगता सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते.

खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून 16 उद्योगपतीचं 18 हजार कोटींचं कर्ज माफ करण्यात आलं आहे, मात्र, शेतकऱ्यांचं 2 हजार कोटींचं कर्ज माफ होऊ शकत नाही. बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. बारामतीत मी येतो तेव्हा 200 बेरोजगार सांगतात की नोकरी द्या, हे सरकार नेमकं कोणाला मदत करतंय,शेतीमालाला किंमत द्यायची नाही, या शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय.

खोडावर घाव घालायचं सोडा तुम्ही पाल्यालाही हाता लावू शकत नाही, भाजप उमेदवार सुरेश धस कडाडले

तसेच एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार सुरु आहेत. मागील 2 वर्षांत महिलांवर अत्याचार अनेक झाले आहेत. पोलिस ठाण्यात ज्या नोंदी आहेत त्या 67 हजार 381 आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता आहेत, अशी टीकाही शरद पवारांनी केलीयं.

माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; आढळरावांनी शेवटच्या क्षणी वळसे पाटलांसाठी डाव टाकला…

मोदींचा घटना दुरुस्तीचा डाव हाणून पाडला :
देशात इंडिया आघाडी एकत्र आली म्हणून पंतप्रधान मोदींचा घटना दुरुस्तीचा डाव हाणून पाडलायं. महाराष्ट्र काय आहे हे लोकसभा निवडणुकीने करुन दाखवलं. यामध्ये बारामतीच्या जनतेने साथ दिलीयं. ज्यांच्या हाती सत्ता ते लोकांना अमिष दाखवतात, अशी टीकाही शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube