कानडा राजा पंढरीचा! श्रोते मंत्रमुग्ध, राहुल देशपांडेंना ईशा यक्ष महोत्सवात मिळालं स्टँडिंग ओव्हेशन

Rahul Deshpande Bhajan at Isha Yaksha Festival : कर्नाटकमध्ये ईशा यक्ष महोत्सव पार पडतोय. मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या भजनाला (Bhajan) या सोहळ्यात स्टॅंडिंग ओव्हेशन मिळालंय.
राहुल देशपांडे यांच्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या भजनाच्या मसादरीकरणाला ईशा यक्ष महोत्सवात स्टँडिंग ओव्हेशन मिळालंय. प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवाआधी तीन दिवसांचा यक्ष महोत्सव (Isha Yaksha Festival) साजरा होतोय. जागतिक कीर्तीचे कलाकार यात सहभागी झालेत. या सोहळ्यासाठी जगभरातून प्रेक्षक उपस्थित आहेत.
तीन दिवसांच्या यक्ष महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी 85 मिनिटांहून अधिक काळ गायन केले. त्यांनी राग मारवा या शुद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाने सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या आत्मिक भक्तिरसयुक्त सादरीकरणाने श्रोत्यांना (Rahul Deshpande Bhajan) मंत्रमुग्ध केलंय. त्यानंतर संत गोरखनाथ यांनी रचलेले निर्गुणी भजन त्यांनी सादर केलं. 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित असलेला यक्ष महोत्सव प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवाच्या आधी साजरा केला जातो.,
अंतिम सादरीकरणात देशपांडे यांनी लोकप्रिय मराठी भजन ‘कानडा राजा पंढरीचा’ हे सादर केलं. त्याअगोदर त्यांनी राग मालकंसमधील बंदीश शिवाला अर्पण केली जाते. देशपांडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षकानीं स्टँडिंग ओव्हेशन दिलं. ही त्यांची ईशा योग केंद्राला पहिली भेट होती.
ऐन उन्हाळ्यात राजकारण तापणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यव्यापी दौरा ‘या’ तारखेपासून होणार सुरू
२६ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे संगीतकार अजय-अतुल आदियोगी समोर प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असण्याची अपेक्षा आहे. पहिल्यांदाच, सद्गुरू मध्यरात्री महामंत्र दीक्षा (‘ॐ नमः शिवाय’) प्रदान करतील, तो सर्वोच्च कल्याणासाठी एक शक्तिशाली मंत्र आहे. या रात्री प्रसिद्ध कलाकारांचे उत्साहवर्धक कार्यक्रम होतील, ज्यामध्ये मुक्तिदान गढवी, पॅराडॉक्स, कॅसमे, साउंड्स ऑफ ईशा, ईशा संस्कृती आणि अनेक प्रादेशिक कलाकारांचा समावेश आहे, जे प्रेक्षकांना 12 तासांच्या उत्सवादरम्यान मंत्रमुग्ध करून ठेवतील.