पारंपारिक आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाप! टी सिरीजचं मंत्रमुग्ध करणारं भजन ‘शंभू’

Shambhu सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज श्रोत्यांना ऐकायला मिळेल.या जोडीने हे भजन खास शिवभक्तांसाठी बनवलं आहे.

Shambhu

A unique blend of tradition and modernity! T-Series’ mesmerizing bhajan ‘Shambhu’ :टी सिरीज आणि भूषण कुमार हे मिक्स स्टेप भक्तीचा आत्मा सादर करणार आहेत. नवा एपिसोड घेऊन येत आहेत.ज्यामध्ये भगवान शिवाची अनंत कृपा आणि पारलौकिक ऊर्जा अनुभवायला मिळणार आहे.यासाठी सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज श्रोत्यांना ऐकायला मिळेल.या जोडीने हे भजन खास शिवभक्तांसाठी बनवलं आहे.पारंपारिक भक्तीची पवित्रता आणि आधुनिक संगीत यांचा अनोखा मिलाप यामध्ये अनुभवायला मिळेल.

जयकुमार गोरे कोण तीस मार खान?, सुषमा अंधारे फलटमध्ये, अनेकांचं नाव घेत केले गंभीर आरोप

यावर बोलताना सचेत टंडन यांनी सांगितले की,मिक्स स्टेपचा हा एक प्रोजेक्ट नसून एक आव्हान होतं.यातील प्रत्येक स्वरामध्ये आम्ही भक्ती प्रेमाने समर्पणाची भावना अनुभवली आहे. यामध्ये आमचा मुख्य उद्देश हा होता की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या आध्यात्मिक भजनांचा वारसा त्यांच्या आधुनिक संगीतातून मिळावा. कारण भगवान शिव हे कायमच आपले मार्गदर्शक आणि ऊर्जादाते असतात आमच्यासाठी देखील हा भगवान शिवाच्या जवळ जाण्याचा मार्ग होता. त्यामुळे या गाण्यासाठी आम्ही टी सिरीज आणि भूषण कुमार सर यांचे अत्यंत आभारी आहोत.

‘सन्मानाचे मरण आणि शेवटचा उंबरठा’, सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम

या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर भगवान शिव यांची ध्यानमग्न स्थिरता आणि उल्हास्मय ऊर्जा दोन्ही पाहायला मिळत आहे.सचेत आणि
परंपरांचे भावपूर्ण गाणं ज्यामध्ये श्रोत्यांना पवित्रतेसह आधुनिकता अनुभवायला मिळत आहे.या भजनातून आधुनिक संगीताच्या जोडीने त्याचा मूळ ढाचा किंवा आत्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.त्यामुळे हे भजन ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी टी सिरीजने प्रेक्षकांना त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

 

follow us