‘सन्मानाचे मरण आणि शेवटचा उंबरठा’, सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम
Sadanand Varde यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराकडून परिसंवाद आणि युवा गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
A special program on the occasion of Sadanand Varde’s birth centenary : ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिवंगत प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराकडून परिसंवाद आणि युवा गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी ६ नोव्हेंबरला सायंकाळी ६.०० वा. नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड, वांद्रे पश्चिम, येथे संपन्न होणार आहे.
निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंचा पुन्हा वार; घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नागरिकांना केलं आवाहन
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘सन्मानाचे मरण आणि शेवटचा उंबरठा’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर, लिव्हिंग वीलचे समर्थक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार, युवा पिढीचे धडाडीचे लेखक प्रा. अजित जोशी सहभागी होतील. उदय दंडवते (कीर्तिमान संरचयिता, संस्थापक सोनीकरीम, सान फ्रान्सिस्को) परिसंवादाचे समन्वयक असतील. अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक रामदास भटकळ असणार आहेत.
आलियाच्या ‘अल्फा’ची आणखी वाट पाहावी लागणार; ‘या’ कारणामुळे रिलीज डेट ढकलली पुढे
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘रंग अमन के’ – एल्गार साथीचा फोक फ्युजन बँड आणि बंकिम साँगकार यांच्या नवगीतांची मैफल सादर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी : झेलम परांजपे – ८६५५०५२२७२ , सुधीर देसाई – ९८२००६६३३७ यांच्याशी संपर्क साधावा.
