आलियाच्या ‘अल्फा’ची आणखी वाट पाहावी लागणार; ‘या’ कारणामुळे रिलीज डेट ढकलली पुढे
Alia Bhatt यश राज फिल्म्सची एक्शन एंटरटेनर ‘अल्फा’, ज्यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Alia Bhatt ‘Alpha’ will have to wait longer; Release date Pushed forward : यश राज फिल्म्सची बहुप्रतीक्षित एक्शन एंटरटेनर ‘अल्फा’, ज्यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे, आता 17 एप्रिल 2026 ला प्रदर्शित होणार आहे! स्टुडिओने जाहीर केले की चित्रपटाचे वीएफएक्स सर्वोत्तम दर्जाचे करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Video : कपिल, सूर्यकुमार, हरमनप्रीत कौर… टीम इंडियाचा विजयाची साक्ष देणाऱ्या तीन कॅचेसची कहाणी
या अॅक्शन थ्रिलरमध्ये आलियासह शर्वरी , तर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल दिसणार आहेत. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेल्या या चित्रपटात आलिया आणि शर्वरी , बॉबी देओलविरुद्ध एका क्रूर आणि श्वास रोखून धरणाऱ्या संघर्षात उतरल्या आहेत.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस सज्ज! पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध कमिट्यांची स्थापना
वायआरएफ च्या प्रवक्त्याने सांगितले, “अल्फा आमच्यासाठी अत्यंत खास फिल्म आहे आणि आम्हाला ती सर्वात सिनेमॅटिक रुपात सादर करायची आहे. वीएफएक्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे आम्हाला जाणवले. आम्ही कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही, म्हणूनच ‘अल्फा’ आता 17 एप्रिल 2026 ला रिलीज होईल.”
मोठी बातमी! नामवंत वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, काय आहे कारण?
अल्फा मध्ये आलियाचा एक नवा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे आणि वायआरएफ सोबत तिचा हा पहिला चित्रपट आहे. आलिया आणि शर्वरी एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर असे काही दाखवणार आहेत जे भारतीय सिनेमात कधीही कोणत्याही अभिनेत्रीने केलेले नाही — हा भारतातील पहिला महिला-नेतृत्वाचा मोठा अॅक्शन चित्रपट ठरणार आहे.
आई अन् मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर प्रदर्शित!
एका अग्रगण्य ट्रेड सूत्राने सांगितले, “अल्फा टीमला प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव द्यायचा आहे. वीएफएक्स वर मोठा दबाव होता आणि डेडलाइन अवास्तव वाटत होती. रिलीज डेट पुढे ढकलणे हा योग्य निर्णय आहे. हे जानेवारी 2026 पर्यंतच्या गर्दीमुळे नाही, तर प्रचंड बाकी असलेल्या वीएफएक्स कामामुळे झाले आहे. त्यामुळे च ‘अल्फा’ फेब्रुवारी ऐवजी एप्रिलमध्ये रिलीज होत आहे.”
