मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस सज्ज! पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध कमिट्यांची स्थापना
Congress पक्षाची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु असून संघटन मजबूत करण्यावर भर देत विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे.
Congress ready for Mumbai Municipal Corporation! Various committees formed to strengthen party organization : राज्यातील विविध पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाला लागले आहेत. त्यात अनेक पक्ष पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत असल्याने नव नवीन पक्ष प्रवेश देखील जोरदार सुरू आहे. त्यात आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी सुरु असून संघटन मजबूत करण्यावर भर देत विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे.
पक्ष संघटनासाठी विविध कमिट्यांची स्थापना…
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी सुरु असून संघटन मजबूत करण्यावर भर देत विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. जाहिरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉर रुमच्या प्रमुखपदी प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती केली आहे.
मोठी बातमी! नामवंत वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, काय आहे कारण?
आमदार अमीन पटेल यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख तर ज्येष्ठ नेते डॉ. मनहास सिंग यांची निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख तर बी. के. तिवारी यांची डिसिप्लेनरी समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र व मुंबईचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या नियुक्त्या केल्याचे जाहीर केले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
