होळीला चांगल्याचा वाईटावर विजय; यशराज फिल्म्सच्या ‘मर्दानी 3’ ची रिलीज डेट अन् राणी मुखर्जीचा स्फोटक फर्स्ट लूक प्रदर्शित!

होळीला चांगल्याचा वाईटावर विजय; यशराज फिल्म्सच्या ‘मर्दानी 3’ ची रिलीज डेट अन् राणी मुखर्जीचा स्फोटक फर्स्ट लूक प्रदर्शित!

Yash Raj Films’ ‘Mardaani 3’ release date and Rani Mukerji’s explosive first look revealed : यश राज फिल्म्सची मर्दानी सीरीज ही हिंदी सिनेमातील सर्वात मोठी महिला-केंद्रित फ्रेंचायझी मानली जाते, जिला गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रशंसा दिली आहे. ही ब्लॉकबस्टर फ्रेंचायझी आता एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखली जाते आणि सिनेप्रेमींमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.

‘या’ कारणासाठी अमृताने “आलेच मी” वर केला खास डान्स !

भारताची सर्वात मोठी आणि एकमेव महिला पोलीस पात्र असलेली फ्रेंचायझी मर्दानी आता तिसऱ्या भागात प्रवेश करत आहे. मर्दानी 3 मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे – जिला न्यायासाठी झगडण्याची प्रेरणा अंतःकरणातून मिळते.

Pune News : स्कूल व्हॅनमध्ये मुलींशी गैरकृत्य; पतितपावन संघटनेकडून चालकाला चोप…

YRF ने आज जाहीर केले की मर्दानी 3 , २७ फेब्रुवारी २०२६, शुक्रवार रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात ४ मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे निर्माते हा चित्रपट रक्तरंजित व प्रचंड हिंसक संघर्ष म्हणून सादर करत आहेत – शिवानीच्या निखळ चांगुलपणाचा सामना होणार आहे अत्यंत क्रूर वाईट शक्तींशी.

प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’

राणी मुखर्जी ने याआधीच स्पष्ट केलं होतं की हा चित्रपट गडद, जीवघेणा आणि निर्दयी असेल – आणि त्यांच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube