प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’

प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’

Ajit Pawar In Pink e-rickshaw distribution program : आज पिंक ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम (Pink e-rickshaw) पार पडला. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलंय की, आजचा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. या कार्यक्रमातून खूप काही साध्य होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक आपण त्यांच्या मूळ गावी चौंडीला करत आहोत. त्यांची 300 वी जयंती यंदा साजरी करत आहोत.

छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक, महात्मा फुले यांचे स्मारक अशी अनेक स्मारक आपण स्थापन करत आहोत. छत्रपती ताराराणी यांची 350 वी जयंती देखील यंदा आहे, त्यांनाही अभिवादन. महिला आणि बालकांसाठी नरेंद्र मोदी (Ajit Pawar News) अनेक योजना राबवत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक योजना आम्ही राबवत आहोत. 80 कोटी रुपये पहिल्यांदा मी या कामासाठी मंजूर केले होते, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला ही योजना राबवायची होती. चांगल्या कंपनीकडून आम्ही या रिक्षा घ्यायचं ठरवलं होतं. आज महिलांना चाव्या देणार आहोत. महिलांना सक्षम, बळकट करायचं आहे. महिला सबलीकरण करायचं असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. महिला आणि मुलींनी रिक्षाने जाताना या पिंक रिक्षाचा विचार करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; वाचा, त्यांच्याविषयी महत्वाचं अन् माहिती नसलेलं

तुम्ही जर पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं, तर त्याचा फोटो काढायचा आणि तुमच्या घरी पाठवून द्यायचा की आता मी या ग्राहकाला घेऊन चालले आहे, जर त्या ग्राहकांनी काय गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत, परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असतात. काही लोक विकृत असतात. पुरुषांना सांगायचं भावा तू माझ्याकडे बसला आहेस, तुझी आठवण म्हणून फोटो काढत आहे. हे गरजेचं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम आम्ही करत आहोत. राज्यात लाडक्या बहिणी विधानसभेला आमच्या पाठीशी विश्वासाने उभ्या राहिल्या. आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला. आम्ही महिलांच्या पाठीमागे मजबुतीने उभे आहोत. अनेकजण आमच्यावर आरोप करतात की, उद्याच्या काळात आमचे हे सगळे कार्यक्रम बंद पडतील. लाडक्या बहिणींचा निधी देणार नाहीत, पण मी आज सगळ्यांना सांगतो की राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली, ती महिलांच्या सन्मानासाठी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या महिला योजनेच्या नियमांत बसतात, त्या महिलांना कधीही हा निधी बंद होऊ देणार नाही.

Video : राहुल गांधींच्या जखमेवर फडणवीसांचा ‘वर्मी घाव’; म्हणाले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय…

कुणाला काय अफवा उठवायच्या आहेत… त्या उठवू द्या, ही योजना बंद होणार नाही. लोकसभेच्या वेळी देखील अफवा उठवली गेले की, हे संविधान बदलतील. पण असं नव्हतं. आपल संविधान जगात श्रेष्ठ आहे. अस संविधान आम्ही बदलणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube